नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी प्रकरणात झालेल्या टीकेवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला असल्याच म्हटलं आहे.
यासंदर्भात बोलत असताना माझ्या तोंडून जे वाक्य निघाल त्याचा विपर्यास करण्यात आला, या प्रकरणाचा फार गाजावाजा करण्यात आला. तरीही मी त्यासंदर्भात माफी मागितली आहे. व त्यासंदर्भातील माझी भुमीका मी स्पष्टपणे मांडली आहे. अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की पीएचडी करण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो हे मी जाणतो. मला कोणावर टीका करायची नाही परंतु अनेक लोक राजकारण्यांवर पीएचडी करतात. त्यामुळे आपण विषय काय निवडतो ते महत्वाच आहे.
मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपबाबबत सतेज पाटलांनी सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावर “फेलोशिप घेऊन विद्यार्थी काय करणार आहेत?” असा प्रश्न अजित पवारांनी केला होता. त्यावर सतेज पाटील यांनी “हे विद्यार्थी पीएचडी करतील”, असं उत्तर दिलं होत. यावर बोलताना अजित पवारांनी “पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत? या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससी, यूपीएससी, आयआरएस अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करायला हवेत”, असं अजित पवार म्हणाले होते.