( Assam ) असामच्या बारक व्हॅली भागात काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीदरम्यान बांग्लादेशचे राष्ट्रगीत ‘अमर सोनार बंगला’ गायल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते बिधुभूषण दास यांनी करिमगंज जिल्ह्यातील सरिभूमी परिसरात आयोजित काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीत हे गीत सादर केले. या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर ग्रेटर बांग्लादेशचा अजेंडा राबवण्याचा आरोप केला.
Read More
( Mangal Prabhat Lodha ) राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या 'वंदे मातरम' गीताला विरोध करणाऱ्या अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. आझमी यांनी वंदे मातरम गीताला विरोध दर्शवत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, त्यावर लोढा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
प्राचीन काळामध्ये भारत हा समृद्ध होता आणि अनेक देशांशी त्याचा व्यापार चालत असे. त्यामुळे अनेक देशांमध्ये आपल्याला आजही भारतीय संस्क़ृतीच्या खुणा आढळतात. काही देशांमध्ये तर भारतीय संस्कृतीचा प्रभाव तेथील राजसत्ता आणि जनमानसावरदेखील पडला. असाच एक देश म्हणजे व्हिएतनाम होय! या व्हिएतनाममधील भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या ‘माय सन’चा घेतलेला मागोवा...
निवडणुका तोंडावर आल्या की, नेतेमंडळींकडून रोजगाराच्या आश्वासनांचीही खैरात वाटली जाते. मग या निवडणुका लोकसभेच्या असो, विधानसभेच्या अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, रोजगार हा विषय आजही तितकाच ज्वलंत आणि गंभीर. बिहारसारख्या राज्यात तर त्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवावी. कारण, अजूनही बिहारमध्ये बेरोजगारीचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा (३.२ टक्के) जास्तच म्हणजे ३.९ टक्के इतका. हीच बाब लक्षात घेता, दर निवडणुकीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी बिहारमधील प्रत्येक कुटुंबाला च
'चार दिवस सासूचे', 'जबरदस्त' ते आयुष्यातले चढ-उतार, ऐका अभिनेत्री मानसी नाईकसह मनमोकळ्या Unfiltered Gappa
सोनम वांगचुक यांच्या नजरबंदीविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. लडाखमध्ये अलीकडे झालेल्या हिंसक घटनांनंतर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एनएसए) 1980 अंतर्गत वांगचुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून, त्याला गीतांजली यांनी आव्हान दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.
सृजनसंवाद प्रकाशन, प्रकाशित तथा सोनाली लोहार लिखित 'बाकी काही नाही' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि. ४ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या मेरी गोल्ड बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला. या समारंभाला ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, कवी व अभिनेते सौमित्र, अभिनेत्री व लेखिका सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री दिग्दर्शिका, लेखिका संपदा जोगळेकर कुलकर्णी, संपादक राजीव खांडेकर तथा मंदार फणसे, सृजनसंवाद प्रकाशनाचे संपादक व कवी गीतेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गीतेश शिंदे म्हणाले की सोनाली लोहार यांच्या क
सतत भाववाढ तरीही सोन्यातील गुंतवणूक ग्राहकांना का आकर्षित करते? काय आहेत कारणं? अनेक वर्षे चाललेली सोन्याची परंपरा आणि त्या परंपरेचं वाखाणणारं नाव म्हणजे वामन हरी पेठे. वामन हरी पेठेंची सोन्याची परंपरा जपणारी सध्याची पिढी म्हणजे त्यांचा खापर पणतू बिझनेस हेड नील तुषार पेठे यांच्याकडून जाणून घेऊया काय आहेत सोन्याच्या वाढत चाललेल्या गुंतवणूकीची कारणं...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात सार्ध शताब्दी महोत्सवाच्या 'वंदे मातरम' गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
संघाची प्रार्थना आणि संघ गीते यांना शंकर महादेवन यांनी नव्या रुपात मांडले. संघात ज्या शैलीत आणि प्रभावीपणे ते होणे अपेक्षित होते, त्यानुसार प्रत्येक गीत समजून त्यांनी ते गायले. एकाअर्थी ही अशक्यप्राय गोष्ट आहे, परंतु शंकरजींनी ती करून दाखवली. याने निश्चितच समाजातही पुढे परिवर्तन घडेल", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
लडाखचे पोलिस महासंचालक (डीजीपी) एस. डी. सिंग जामवाल यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे सांगून, २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार धरले.
(Ladakh Protest) लडाखला केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा मिळावा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश करावा, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. या मागणीसाठी काही दिवसांपासून लडाखमधील आंदोलकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बुधवारी २४ सप्टेंबरला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाची पोलिस आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले.
आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी दिले. राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
संपुआच्या काळात विकास हा कायमच उपहासाचा विषय ठरला. आजवर विविध कारणांचे दाखले देत राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयाकडे काँग्रेसने कायमच कानाडोळा केला. एखाद्या प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या मनात भीती निर्माण करणे यात काँग्रेस आघाडीवर. आताही सोनिया गांधींचा ‘द मेकिंग ऑफ अॅन इकोलॉजिकल डिजास्टर इन द निकोबार’ हा नुकताच इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेला लेख काँग्रेसच्या या अपयशी नीतीचे उत्तम उदाहरण ठरावा.
दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची विनंती करणाऱ्य़ा याचिकेवर निकाल राखून ठेवला आहे. याचिकेत असा दावा केला आहे की गांधी यांचे नाव भारतीय नागरिक होण्यापूर्वी, तीन वर्षांपूर्वीच मतदार यादीत समाविष्ट झाले होते.
भारतात दरवर्षी सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मन्थ’ (big butterfly month) म्हणजेच फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा केला जातो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपण घराच्या घरी फुलपाखरांना कशा प्रकारे आकर्षिक करू शकतो, याविषयी माहिती देणारा हा लेख...
भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच तीन वर्षांपूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची मागणी करणारी फौजदारी तक्रार दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होईल.
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे.घरोघरी बाप्पांचं आगमन झालंय. सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. सुंदर आरास सेलेब्सच्या घरी पाहायला मिळत आहे.
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटर यांची नोंदणी आणि नोंदणी नुतनीकरण नियमितपणे केले जाते. ही रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटर नोंदणी आणि नुतनीकरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणारी असावी या दृष्टीने ही प्रक्रिया आता पुर्णपणे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या मुळे रुग्णालयांना आणि सोनोग्राफी सेंटर यांना नोंदणी आणि नुतनीकरणासाठी महापालिका कार्यालयात येण्याची गरज नाही.
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार्या शास्त्रीजींचा काळ कधीच इतिहासजमा झाला. आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावरही मंत्रिपद न सोडणार्या नेत्यांचा काळ आहे. अशा निलाजर्या नेत्यांसाठी कायद्याचा असूडच कामी येतो. म्हणूनच भ्रष्टाचार हा आपला सत्तासिद्ध अधिकार असल्याची समजूत असलेल्या नेत्यांसाठी मोदी सरकारने नवे कायदे केले. त्यांना विरोध करून आपण कोणत्या बाजूचे आहोत, हे विरोधकांनी काल दाखवून दिले.
“विमानाच्या घराला नाव पायजे, तर इमानाच्या घराचं नाव पायजे!” या गगनभेदी शब्दांनी श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी भरलेल्या तिसऱ्या आगरी साहित्य संमेलनाचा प्रारंभच जणू ‘नवी मुंबई विमानतळ नामकरणा’वरील ठाम घोषणेतून झाला. भाषाप्रभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या आगरी बोलीतील प्रखर प्रवचनाने श्रोत्यांची मने जिंकलीच, पण ‘दि.बा. पाटील’ यांच्या नेतृत्वाची उजळणी करत त्यांनी ठणकावले की समाजाच्या इतिहासाशी, त्यागाशी आणि अस्मितेशी कुणालाही खेळ करता येणार नाही.
सोनिया गांधी या भारतीय नागरिक होण्यापूर्वीच त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा पुरावा भाजपने बुधवारी दाखवून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जागृती फाऊंडेशनच्या वतीने रविवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
बिहारमधील मतदार पडताळणी प्रकरणावरून विरोधकांचा संयम संपत आला असून, दिवसेंदिवस विरोधक टीकेची खालची पातळी गाठत असल्याचे चित्र आहे. नुकतेच बिहारमधील मतदार पडताळणीवरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोग काम करीत असल्याची टीका करीत, हा देशद्रोह असल्याची टीकाही केली. मात्र, देशाच्या इतिहासात डोकावले असता, निवडणूक आयोगाला ओलीस ठेवून लोकशाहीला नख लावण्याचे काम हे नेहरु-गांधी घराण्यानेच केले.
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही एका लेखाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी गाझाविषयक मानवाधिकारांवरुन मोदी सरकारवर बिनबुडाची टीका केली. पण, याच सोनिया गांधींना भारतात आणि शेजारी देशांत हिंदूंवर होणारे अत्याचार कधीच दिसले नाहीत, पण दूरदेशी मुस्लिमांचे बळी पडताना दिसतात. ही भारतातील अल्पसंख्याक मत
ज्याला आम्ही मृत्यू समजतो, ती घटना म्हणजे जीवात्म्याची जडशरीर त्यागानंतरची महानिर्वाण यात्रा होय. जीवात्म्याच्या उद्देशपूर्तीच्या दृष्टीने नियतीद्वारा हे जडशरीर अनावश्यक वाटल्यामुळे, जीवात्मा नियत जडशरीराचा त्याग करून दिव्य मार्गाला गमन करतो. यालाच आम्ही ‘मृत्यू’ मानतो. मृत्यूला आम्ही एक भयानक आणि सर्वस्व हरण करणारी घटना मानतो. पण खर्या दृष्टीने पाहिल्यास मरण ही प्राकृतिक अवस्था असून जीवित राहणे हीच विकृती होय, असे दिसून येईल. कवी कालिदास रघुवंशात म्हणतात,
संगीताच्या माध्यमातून एकीकडे मायबाप रसिकांच्या काळजात घर करत, दुसरीकडे कलेच्या नव्या विश्वात स्वप्नांच्या शोधार्थ स्वच्छंद विहार करणार्या प्रवानंत तांबे याच्याविषयी...
‘कन्यादान’ या सामाजिक संस्थेशी जोडले जात, थेट अध्यक्षपदाची धुरा सार्थपणे सांभाळत, शेकडो गरजू जोडप्यांची विवाहगाठ बांधून या जोडप्यांचे आयुष्य फुलविणार्या सुषमा सोनी यांच्याविषयी...
(Tata Group Sets Up Rs 500 Crore Welfare Trust For Air India Plane Crash Victims) गेल्या महिन्यात १२ जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने शुक्रवारी १८ जुलैला मुंबईमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी औपचारिकपणे पूर्ण केली आहे. 'द एआय-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' असे या ट्रस्टला नाव देण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्क
रेल्वेची सुरक्षा सांभाळणार्या आरपीएफ आणि जीआरपीच्या देशभरातील शीर्षस्थ अधिकार्यांची दिल्लीत अलिकडेच राष्ट्रीय परिषद पार पडली. रेल्वे मंत्रालयातील बडी मंडळीदेखील यावेळी उपस्थित होती. या संपूर्ण परिषदेत रेल्वेतील गुन्हेगारी हाच चिंतनाचा विषय होता. परिषदेनंतर आयपीएस सोनाली मिश्रा यांच्या नावावर डीजी आरपीएफ म्हणून शिक्कामोर्तब झाले होते, सोनाली मिश्रा असे या महिला पोलीस अधिकार्याचे नाव असून त्या १९९३ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत.
अपंग व्यक्तींविषयी असंवेदनशील भाष्य केल्याच्या प्रकरणी कॅामेडियन समय रैना, विपुन गोयल, बलराज सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांना मंगळवार, दि.१५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.जयमाला बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि त्याचा उपयोग इतरांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करण्यासाठी होऊ शकत नाही.”
मुंबईच्या कांदिवलीतील सीब्रुक नावाच्या सोसायटीत राहणाऱ्या गुजराती मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या अल्पवयीन मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने सोसायटीच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
गोरेगावमधील बांगूरनगर मेट्रो स्थानकावर पालकांचे लक्ष नसल्यामुळे दोन वर्षांचा मुलगा मेट्रोमधून अचानक बाहेर आला आणि तिथेच थांबला. मात्र मेट्रो स्थानकावरील तैनात कर्मचाऱ्यानी तात्काळ लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याने तात्काळ मेट्रो चालकाला ट्रेन सुरू करू नको असे सांगितले. त्यानंतर मेट्रोचे दार उघडले आणि मुलगा पुन्हा सुखरुप आत गेला.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील भूमीपुत्रांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. ४० वर्षापासून १२.५% योजनेअंतर्गत देय भूखंड प्रलंबित असलेल्या ३१९ पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इरादापत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रालयातील दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.
पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुश्ताक बाबा यांची रिपाइं च्या अल्पसंख्यांक आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या विमानात ती फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिने बुधवारी आईवडीलांचा निरोप घेतला खरा पण तो निरोप शेवटचा ठरला. विमान दुर्घटनेत रोशनीने आपला जीव गमावला आहे.
कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणार पहिला 'राज्य प्रेरणा गीत पुरस्कार' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी..." या गीताला प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगळवार, दि. २७ मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
ज्ञानदानाचे व्रत हाती घेऊन, दिव्यांगांचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी स्वतःच्या अधुपणावर मात करत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या बाळासाहेब सोनवणे यांच्याविषयी...
ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत, भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत. त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरून ही भावगीत आणि भक्तीगीते नियमित प्रसारित करा, अशी सूचाना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवार, दि. २१ मे रोजी केली.
दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत, अशीच आणखी एक दु:खद घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. खानापूर या गावात दारुच्या नशेत वडिलांनी आपल्याच मुलाचा जीव घेतल्याची ही घटना.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने दोन्ही नेत्यांना नोटीस बजावली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेल्या पालघर येथील वाढवण बंदरासाठी ५ हजार, ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
Constitution आजच्या घडीला काँग्रेसने संविधानाचा आणि त्याच्याशी सर्व भारतीयांच्या जोडलेल्या भावनांचे जे राजकारण केले आहे, ते चिंताजनकच नव्हे तर, अपमानकारकदेखील ठरते. कारण, काँग्रेसकडे संविधानाचे रक्षणकर्ते असल्याचे दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न विचारायलाच हवा.
National Herald गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेसी इकोसिस्टीमने लोकशाही धोक्यात असल्याची आरोळी ठोकली. पण, मुळात हा घोटाळा आणि त्यासंबंधीच्या चौकशीला गेल्या काही वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई मुळीच नाही. पण, मुळात काँग्रेस आणि घोटाळे हे राजकीय समीकरणही जुनेच! आजच्या लेखात नेहरुंच्या काळातील जीप खरेदी घोटाळा, संजय गांधींचा ‘मारुती’ प्रकल्पातील गैरव्यवहार, राजीव गांधींचा ‘बोफ
महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय शो ची भुरळ अगदी सेलेब्रिटीनांही पडली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतीच या मंचावर उपस्थिती लावली. महेश मांजरेकर यांनी या शोसाठी खास धोतर-कुर्ता असा पोशाख परिधान केला होता. अशा प्रकारचा शो करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून, सोनीने आणलेल्या अनोख्या संकल्पनेला त्यांनी मनापासून दाद दिली.
( Devendra Fadanvis on soniya gandhi ) “लॉर्ड मेकॉले यांनी आम्हाला गुलाम बनवण्यासाठी जुनी शिक्षणपद्धती आणली होती. त्यामुळे ती आम्हाला कदापि मान्य नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आतातरी भारतीय शिक्षणपद्धतीचा स्वीकार करावा,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी केला.
(CM Devendra Fadnavis on Sonia Gandhi's Article) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतेच एका लेखाच्या माध्यमातून भारताच्या नवीन शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी सोनिया गांधींनी आता तरी भारतीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुंबई : 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या भारतातील पहिल्या रिअॅलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १०८ सहभागींसह, सुरु होणारा हा शो महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणणार आहे. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या रिअॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनाव
भाजप आपल्या संघटनेत कार्यकर्त्यांमधून नेतृत्व तयार करते, आणि काँग्रेस नेतृत्व आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवते! मग पक्षाच्या अधोगतीला जबाबदार कोण? भाजप की राहुल गांधी? खरं तर, हा प्रश्न आता काँग्रेसच्या उरलेल्या निष्ठावंतांनी स्वतःला विचारायला हवा. राहुल गांधी यांची एकूणच नेतृत्वशैली बघता, काँग्रेसचा भविष्यकाळही अंधारातच जाणार, हे निश्चित! why rahul gandhi says congress leaders working for bjp ?