सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे.घरोघरी बाप्पांचं आगमन झालंय. सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. सुंदर आरास सेलेब्सच्या घरी पाहायला मिळत आहे.
स्वप्नील जोशी

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले आहेत. स्वप्नीलच्या बाप्पाची खासियत म्हणजे स्वप्नील बाहेरुन मुर्ती खरेदी न करता चांदीच्या मुर्तीची स्थापना करतो.
प्रार्थना बेहेरे


अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या घरीसुद्धा बाप्पा आले आहेत. पारंपरिक वेषात तिने फोटो शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णी 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही बाप्पाचं स्वागत केलं. सोनालीने नेहमीप्रमानेच पर्यावरणपूरक हाताने मुर्ती साकारली होती. तिचा भाऊ अतुल कुलकर्णीने तिला मुर्ती साकारायला मदत केली होती.
पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सांवतने देखील कुटुंबियासह गणेशोत्सव साजरा केला. पूजाच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ

ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं आहे.
वैद्येही परशुरामी
अभिनेत्री वैद्येही परशुरामीनेही पारंपरिक पद्धतीत बाप्पाचं स्वागत केलं आहे.
श्रेया बुगडे

अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरीदेखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले आहेत. सुंदर आरास आणि पारंपरिक लुकमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत.
विवेक सांगळे

अभिनेता विवेक सांगळेने यावर्षी त्याच्या नव्या घरात बाप्पााला आणलं आहे. याचे काही फोटोस त्याने शेअर केले आहेत.
मृणाल दुसानिस 
अभिनेत्री मृणाल दुसानिस मागच्या वर्षी परदेशातून भारतात परत आली आहे. तर आता ती भारतातच राहणार आहे. त्यामुळे मृणालने देखील तिच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.