रुग्णालय आणि सोनोग्राफी सेंटर नुतनीकरण प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन

    21-Aug-2025   
Total Views |

कल्याण : केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटर यांची नोंदणी आणि नोंदणी नुतनीकरण नियमितपणे केले जाते. ही रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटर नोंदणी आणि नुतनीकरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणारी असावी या दृष्टीने ही प्रक्रिया आता पुर्णपणे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या मुळे रुग्णालयांना आणि सोनोग्राफी सेंटर यांना नोंदणी आणि नुतनीकरणासाठी महापालिका कार्यालयात येण्याची गरज नाही.

महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून स्वतंत्र ईमेल आयडी रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटर यांना उपलब्ध करुन दिला जाणार आहेत. त्यावरुन त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सादर करता येतील. संपूर्ण प्रक्रियेची माहिती आणि अर्ज सादर करण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे वेळेची बचत होणार असून रुग्णालय नोंदणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनीनी त्यांच्या रुग्णालयाचे आणि सोनोग्राफी सेंटरनी वेळेत आपले नूतनीकरण ऑनलाईन पद्दतीने पूर्ण करावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.