उबाठा गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी नाशिक शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Read More
त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ओळखले
कोल्हापूर महानगरपालिकेतील ३ माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून आता पक्षाने पुन्हा एक नवीन मोहिम हाती घेतली आहे. या माध्यमातून राज्यभरातून गुगल फॉर्मद्वारे नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
( ED arrested former Chairman and Managing Director of UCO Bank, Subodh Kumar Goyal ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यूको बँकेचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. बँक फसवणूक प्रकरणात ‘कॉनकास्ट स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड’सह इतरांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.
(Joe Biden diagnosed with Prostate Cancer) अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. बायडन यांना प्रोटेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयाने रविवारी १८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले.
( ISKCON work is pride Former MLA Narendra Pawar ) आपली आध्यात्मिक संस्कृती आणि परंपरा गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य इस्कॉन संस्था करत असून ते आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी काढले.
( including 16 sarpanches, 6 corporators, including former chairman join BJP hingna vidhansabha) नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य उज्जवला बोढारे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी शरद पवारांची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
( Pahalgam terrorist attack Former MLA Narendra Pawar demand to Union Railway Minister Ashwini Vaishnav ) कश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघा जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी अतुल मोने हे मध्य रेल्वेमध्ये कामाला होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोने यांच्या पत्नीला नोकरी देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम
( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
Rekha Gupta दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी नवनिर्वाचित भाजपच्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कामचा सपाटा लावून धरला आहे. त्यानी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाले आणि नदी सफाईबाबत उचलेले पाऊल उल्लेखनीय आहे. अशातच आता त्यांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. यामुळे आता काही महिला, युवतींना छेडछाड करणाऱ्याला सुट्टी नसणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेखा गुप्ता यांनी शिष्टाचार पथकाच्या फॉर्म्युल्याचा वापर क
कॅनडाच्या राजकारणातील आधुनिक इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची कारकीर्द ही गोंधळ, दुटप्पी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय अपयश यांचे मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे. त्यांनी खलिस्तानसारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर कॅनडाच्या जागतिक विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाले. ‘जागतिक हरित धोरण’ आणि मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांनी, आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेक भावनिक भाषणे केली. पण, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील अस्थिरतेने कॅनडाच्या व्यापार, गुंतवणूक आणि परराष्ट्र
रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्या आणि लावणी साकारणार्या पवन तटकरे याच्याविषयी...
ज्या निष्पक्षपणे चंद्रचूडांनी रामजन्मभूमी खटल्यात न्याय्य भूमिका घेतली, त्याच परखडपणे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगाबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. आस्तिक-नास्तिक या वादात त्यांनी घेतलेल्या पवित्र्याचे कौतुक करायला हवे.
आज ‘स्वर्णवंदना’ या कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे भव्य आयोजन होत आहे. ज्यांच्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून ही वंदना दिली जात आहे, त्या तपस्विनी ‘नृत्यार्पिता’ पं. मनीषा साठे यांच्याविषयी...
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजण्याआधीच उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील 'उबाठा'चे माजी नगरसेवक एकेक करून महायुतीमध्ये प्रवेश करीत असताना, आता छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखील ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली आहे. शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवाहर बाग वैकुंठभूमीत त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निध
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan singh ) यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली. भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धीर दिला.
नवी दिल्ली : जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान ( Former PM ) डॉ. मनमोहन सिंग शनिवारी दुपारी पंचत्त्वात विलीन झाले. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव लष्करी वाहनातून दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे त्यांना २१ तोफांची सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
(Dr. Manmohan Singh Death )भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन २६ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांचे दि. २६ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, परंतु संसदेत सुषमा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावर मनमोहन सिंग यांनी 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख', अशा शायरीतून प्रत्य
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती (निवृत्त) व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एमएचआरसी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, प्रियांक कानुंगो आणि न्यायमूर्ती (निवृत्त) विद्युत रंजन सारंगी यांची आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकार्यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी ही माहिती दिली. न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एमएचआरसी प्रमुखाचे पद रिक्त होते. रामसुब्रमण्यम यांच्या नियुक्तीमुळे आयोगाला नवे नेतृत्व मिळाले आह
नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी प्रमुख ओमप्रकाश चौटाला ( Omprakash Chautala ) यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(Ram Shinde) महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राम शिंदे यांनी बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला आहे. तसेच याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल आदी उपस्थित होते.
जन्मदरातील अभूतपूर्व घट कमी करण्यासाठी जपान सरकार निरनिराळे मार्ग अवलंबताना दिसते. तरुणांना कुटुंबनिर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जपान सरकारचे आता आपल्या कर्मचार्यांकरिता ‘चार दिवसांचा कार्य आठवडा’ लागू करण्याचा मानस असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukar Pichad ) यांचे शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. आदिवासींच्या हक्कासाठी व्यापक लढा उभा करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती.
मुंबई : सरकार स्थापन करताना गावाला यायचे नाही? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुकीत एवढे दौरे आणि प्रचार झाले. निवडणूक आम्ही महायुती मोठ्या मताधिक्यांनी जिंकलो, अशी माहिती राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, मी नेहमी सांगायचो की, जनता आम्हाला कामाची पावती देईल. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामे थांबवल
नाशिक : दुचाकी वेगाने चालविणार्या चालकास हटकल्याचा राग येऊन कामगारनगर येथील काळेनगर भागात राहणार्या माजी नगरसेविका योगिता आहेर ( Yogita Aher ) यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक केली. तसेच क्षुल्लक कारणावरून वाद घालत बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी आहेर यांच्यासह त्यांचा मुलगा व भावाला मारहाण केल्याचीदेखील घटना घडली. आहेर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दुचाकीस्वार संशयित करण कटारे (२२, रा. संत कबीरनगर) वेगात दुचाकी चालवत होता. यावेळी आहेर यांनी त्याला हटकले व गाडी हळू चालवण्यास सांगितले. त्याचा या दुचाकीस्वाराला
(Mukul Rohatgi) भारताचे माजी महान्यायवादी आणि नियुक्त वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी अदानी समूहावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत हे आरोप निराधार असल्याचा खुलासा केला आहे. यूएस फेडरल करप्शन प्रॅक्टिसेस ॲक्ट अंतर्गत आरोप केल्याची बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
(Israel) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट तसेच हमासच्या लष्करी कमांड यांच्याविरोधात युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हेग स्थित इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी अटक वॉरंट जारी केले आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी खैर येथील जाहीर सभेत अल्पसंख्याक दर्जा आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून समाजवादी पक्षाला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सपाच्या ‘पिछडा – दलित - आदिवासी’ अर्थात ‘पीडीए’ रणनितीस भाजपने ‘एएमयू’द्वारे कोंडीत पकडले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेतून शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी फडणवीसांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा यांनी त्यांचे औक्षण केले.
विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. ते शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी भव्य रॅली काढली. यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीच्या तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, विधानसभेचे तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अशातच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने भव्य नामांकन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( CM Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून आयटीआय वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
( BJP )आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी जाहीर केली. त्यातील २४ उमेदवार गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
(Sitaram Dalvi) अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिताराम दळवी यांचे शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन. ते ८२ वर्षांचे होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. महारेराचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज दि, २० सप्टेंबर २०२४ रोजी संपला आहे.
शिट्टीच्या स्वरुपात संगीताचे सूर सातासमुद्रापलीकडे नेणार्या ‘स्मायलिंग व्हिल्सर’ म्हणून सुपरिचित, मुंबईच्या निखिल राणे यांच्याविषयी...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी पुन्हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्याची साद घातली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अर्ज मागे घेण्यापर्यत वेळ आहे अस त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशुन म्हटलं आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
भारत-चीन सीमेवर सुरक्षा मजबूत करण्याकरिता, भारतीय सैन्याने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याकडे माध्यमांचेही फारसे लक्ष गेले नाही. ‘सेंट्रल कमांड’ जे लखनौस्थित आहे, त्यांचे एक फॉर्मेशन उत्तर भारत एरिया बरेलीमध्ये स्थित आहे. हे ‘स्टॅटिक फॉर्मेशन’ आहे, ज्याच्या खाली ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह’ म्हणजे सेवा प्रदान करणारी युनिट्स येतात. जसे की ट्रेनिंग सेंटर, हॉस्पिटल आणि इतर. मात्र, आता हेडक्वार्टर उत्तर भारत एरियाचे सीमेवर लढण्याकरिता ‘१८ कोर हेडक्वार्टर’मध्ये रुपांतर (लेर्पींशीीं) करण्यात आले आहे. त्याकरिता लागणारी जा
आठ अब्ज ते चार ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असा भारतीय शेअर बाजाराने गाठलेला विक्रमी पल्ला केवळ अचंबित करणाराच! त्याचबरोबर देशातील डिमॅट खात्यांची वाढती संख्याही भारतीय अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र दर्शविणारी. तेव्हा, एकूणच वाढती डिमॅट खाती आणि वधारणारी शेअर बाजारातील गुंतवणूक, हे भारतीयांच्या पैशाचे अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून (इन्फॉर्मल) औपचारिक (फॉर्मल इकोनॉमी) अर्थव्यवस्थेकडील स्थित्यंतराचे द्योतकच म्हणावे लागेल.
मुंबईत संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नरिमन पॉईंट येथील एनसीपीए संकुलात माजी सैनिकांचा मेळावा सुरू असल्याचे समजताच, तिकडे जात मुख्यमंत्र्यांनी माजी सैनिकांशी संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तीन्ही सैन्य दलातील माजी सैनिक उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत आपल्या आक्रमक फंलदाजी शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपला दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीलाच वॉर्नरने आपली निवृत्ती जाहीर करत क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिला.
ईशान्य भारतातील बंडखोरांना चीनद्वारे मदत दिली जाते. त्यामुळे मणिपूर हिंसाचारामध्येही परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे : ठाण्यातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेच्या १४ आजी माजी सहाय्यक आयुक्तांची चौकशी करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सभागृहात करण्यात आला होता. मात्र,अद्याप ही चौकशी गुलदस्त्यात असून चौकशीचे गु-हाळ सुरूच असल्याने अहवालांना केवळ 'तारीख पे तारीख' मिळत आहे. आता महेश आहेर या अधिकाऱ्याची चौकशी सुरु आहे. तेव्हा, या चौकशांचे गौडबंगाल बनले असल्याची टीका होऊ लागली आहे.
मागील दहा वर्ष दिव्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई कृत्रिम असून दिव्यात मनमानी कारभार करणाऱ्या शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील या जोडगोळीच्या गलथान कारभारामुळे पाण्याची समस्या लोकांना भेडसावत आहे. असा घणाघाती आरोप भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.