भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

    27-Dec-2024
Total Views | 48
 
dr. manmohan singh
 
मुंबई : (Dr. Manmohan Singh Death )भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन २६ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले.
 
डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा २६ डिसेंबर २०२४ पासून १ जानेवारी २०२५ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
 
डॉ. मनमोहन सिंग यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121