ठामपाच्या १४ सहायक आयुक्तांची चौकशी गुलदस्त्यात

तरीही, चौकशीचे गु-हाळ सुरूच, महेश आहेरच्या चौकशीचे कवित्व

    05-Apr-2023
Total Views | 32
 unauthorized construction in Thane Municipal Corporation

ठाणे : ठाण्यातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेच्या १४ आजी माजी सहाय्यक आयुक्तांची चौकशी करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सभागृहात करण्यात आला होता. मात्र,अद्याप ही चौकशी गुलदस्त्यात असून चौकशीचे गु-हाळ सुरूच असल्याने अहवालांना केवळ 'तारीख पे तारीख' मिळत आहे. आता महेश आहेर या अधिकाऱ्याची चौकशी सुरु आहे. तेव्हा, या चौकशांचे गौडबंगाल बनले असल्याची टीका होऊ लागली आहे.
ठाणे महापालिकेचे वादग्रस्त अधिकारी महेश आहेर यांची चौकशी करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून समितीची स्थापना करण्यात आली असून पुढील तीन आठवडे या समितीकडून चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी कोरोना काळात ठाणे शहरात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला होता. याच मुद्यावरुन दोन वर्षांपूर्वी स्थायी समिती, महासभेत गदारोळ झाला होता. परंतु ज्या ज्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यकाळात अनाधिकृत बांधकामे झाली, अशा सर्व आजी - माजी सहाय्यक आयुक्तांची चौकशी करुन कारवाई करावी, असा ठराव झाला होता.
त्यानंतर मागील काही दिवसांपासून या सहाय्यक आयुक्तांची चौकशी तत्कालीन समितीमार्फत सुरु आहे. जे शासनाकडून आलेले सहाय्यक आयुक्त होते, त्यांची चौकशी शासनामार्फत सुरु आहे. तर उर्वरीत अधिकाऱ्यांची चौकशी ठाणे महापालिकेमार्फत सुरु 
आहे. मात्र चौकशी समिती स्थापन करून दोन वर्षांचा कालावधी उलटला.तरीही, या चौकशी समितीने अद्याप कोणताच अहवाल सादर केलेला नाही. नेमकी या चौकशी समितीचे झाले काय याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, चौकशीचे गु-हाळ सुरूच असुन चौकशीसाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. सध्या केवळ सहाय्यक आयुक्तांची बाजू ऐकून घेण्याचे काम सुरु आहे.
चौकशी काळातही बेकायदा बांधकामे

अनधिकृत बांधकाम प्रकरणी मागील दोन वर्षांपासून या सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरु आहे. दुसरीकडे या कालावधीत विशेष करून कळवा प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. तसेच अजूनही काही भागात बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे या चौकशीमधून काय निष्पन्न होणार ? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121