देशाची आध्यात्मिक क्षमता जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे इस्कॉनचे कार्य अभिमानास्पद - माजी आमदार नरेंद्र पवार

- श्री नरसिंह चतुर्दशीनिमित्त कल्याणातील इस्कॉन केंद्राला दिली भेट

    12-May-2025
Total Views | 18
 
ISKCON work is pride Former MLA Narendra Pawar
 
कल्याण : ( ISKCON work is pride Former MLA Narendra Pawar ) आपली आध्यात्मिक संस्कृती आणि परंपरा गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य इस्कॉन संस्था करत असून ते आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी काढले.
 
कल्याण पश्चिमेतील अमृत पार्क येथे असलेल्या इस्कॉन केंद्राला श्री नरसिंह चतुर्दशीनिमित्त नरेंद्र पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते याठिकाणी आरती करण्यासह इस्कॉन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरवही करण्यात आला.
 
आजच्या घडीला जगामधील प्रत्येक लहान मोठ्या देशामध्ये इस्कॉन संस्थेचे केंद्र असून त्याद्वारे आपली संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माची शक्ती आज संपूर्ण जगासमोर मांडली जात आहे. कारण भौतिक सुखामध्ये नाही तर आत्मिक सुखामध्येच खरे आयुष्याचे समाधान आहे याची जाणीव आता या परदेशी नागरिकांना होऊ लागली आहे. त्यामुळेच तर आज जगभरातील हजारो परदेशी नागरिक आपल्या संस्कृती आणि परंपरेचा स्वीकार करत आहेत. आणि यामध्ये निश्चितच इस्कॉन केंद्राचा खूप मोठा वाटा असल्याचेही आपण यावेळी नम्रपणे सांगितले.
 
तर कल्याणात सुरू झालेल्या या इस्कॉन केंद्राच्या प्रचार आणि प्रचारासाठी आपण तन आणि मन लावून काम करू. तसेच आपल्याकडून जे जे काही शक्य आहे ती सर्व आवश्यक मदतही आपण करू असे आश्वासनही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी दिले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमेतील इस्कॉनचे प्रमुख पदाधिकारी अनिरुध्द भगवान दास, प्रभानु दास, सीए उत्कर्ष मेहता, सीए निर्मल सिंग यांच्यासह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121