कोल्हापूरातील ३ माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल!

    25-Jun-2025
Total Views | 45

मुंबई : कोल्हापूर महानगरपालिकेतील ३ माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार किशोर अप्पा पाटील, माजी आमदार जयश्री जाधव तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, माजी महापौर सुनील कदम, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव, माजी सभापती अभिजित चव्हाण, माजी शिक्षण समिती सभापती रशीद बारगीर, माजी नगरसेविका रीना कांबळे, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, गीता गुरव, अनुराधा खेडेकर, अर्चना राजू पागर, सीमा कदम, कविता माने, सुनंदा मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तसेच यावेळी पाचोरा विधानसभा मतदारसंघातील बंडू माने, सचिन मिस्त्री, अमोल मिस्त्री, किशोर सुतार, दंगल भोई, राकेश सुतार, शाळीग्राम सुतार, प्रवीण सुतार यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीदेखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

कोल्हापूर पालिकेवर भगवा फडकवायचाय!

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रमुख नगरसेवक शिवसेनेमध्ये आले आहेत ही आनंदाची बाब आहे. विधानसभा निवडणुकीत याच कोल्हापूरातून आम्ही महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि पाच आमदारांच्या रूपाने येथील जनतेने आम्हाला भरभरून मतांचे दान दिले. गेल्या अडीच वर्षांत विविध विकासकामांसाठी आम्ही ४ हजार २०० कोटी रुपयांचा निधी या शहराला दिला. आता पुन्हा एकदा कोल्हापूरचा विकास करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन पालिकेवर भगवा फडकवायचा आहे," असे ते म्हणाले.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसमधल्या

काँग्रेसमधल्या 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, महत्त्वाच्या पदावर पाणी सोडलं! सांगितलं 'हे' कारण...

(Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121