राज ठाकरेंवर अवलंबून असलेले पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यासाठी उतावीळ झाले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटावर केली आहे. बुधवार, १६ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
Read More
रत्नदुर्ग किल्ल्यालगत असलेल्या भाटकरवाडा येथील समुद्रात टेहळणी पाणबुरूजाजवळ भराव टाकून अतिक्रमण केले गेले आहे. या अतिक्रमणांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासन कारवाई करणार का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.
मालेगावमधील अवैध पशूवधखान्यांवर लवकरच हातोडा पडणार आहे. भाजप आ. विक्रांत पाटील यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर मंत्री उदय सामंतांनी मंगळवार, दि. २१ जुलै रोजी विधान परिषदेत कारवाईची घोषणा केली.
स्वतःचे २० नगरसेवकदेखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळे उबाठाचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
कांजूरमार्ग-विक्रोळी येथील कचराभूमीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. ही समिती ६० दिवसांत अहवाल सादर करेल आणि त्यानुसार कंत्राटदारावर कारवाई होईल. तसेच, या डंपिंग ग्राउंडला पर्याय म्हणून नवीन जागा शोधण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत.
गिरणी कामगारांच्या आंदोलनातून अनेक लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
संजय गायकवाड यांच्या कृतीशी आम्ही कुणीही सहमत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना त्यांनी घरचा आहेर दिला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्द्घाटन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विमानतळ असून एकाचवेळी ३५० विमाने या विमानतळावर उभी करता येतील एवढी क्षमता याची आहे. तसेच वर्षाला सुमारे ९ कोटी प्रवासी हवाई वाहतुकीचा आनंद यामुळे घेऊ शकतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून त्याचे उद्घाटन सप्टेंबरअखेरीस केले जाणार आहे.
जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्नपडताळणी करण्याचे आदेश दिले जातील. तसेच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल. बनावट प्रमाणपत्रास मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सेक्टर १ ते ११ क्रमांकाच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून, पूर्वी बंगल्यांसाठी किंवा रो हाऊससाठी मिळालेल्या भूखंडांवर उभारलेल्या बहुमजली इमारती आणि त्यामधील सदनिकांच्या विक्री प्रकरणी सिडकोने नियमितीकरणासाठी धोरण आणले आहे. काही प्रकरणे या धोरणांतर्गत नियमितही करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
गेल्या दोन दिवसांपासून उबाठा गटातील जेष्ठ नेते भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आता भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्विकारले तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल, असे विधान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेले प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन अखेर शनिवार, १४ जून रोजी त्यांनी स्थगित केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी राज्य सरकारच्या पत्राचे वाचन केले आणि त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
मंत्री उदय समांत यांनी शनिवार, १४ जून रोजी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेट देत राज्य सरकारच्या पत्राचे वाचन केले. त्यानंतर बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेले आंदोलन स्थगित केले.
राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता मनसेच्या दोन नेत्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर या दोन्ही नेत्यांनी उदय सामंतांची भेट घेतली.
"आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलेले आहे. समाज माध्यमांमुळे मोठमोठ्या घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते. हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगले काम करून घेण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते", असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली असून हा निचपणाचा कळस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
(Uday Samant) राज्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेत कुणाचे इनकमिंग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( sunil prabhu on kadivali MIDC land ) कांदिवली औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या भूखंडाचा नियमबाह्यरित्या व्यवसायिक वापर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या जागेवर बार, पब, जिम आणि दुकाने थाटण्यात आली आहेत. विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे आ. सुनील प्रभू यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. चारकोप परिसरातील सुमारे 116 एकर भूखंड औद्योगिक वसाहतीला औद्योगिक प्रयोजनासाठी प्रतिचौ.मी. 66 रुपये इतक्या माफक दराने वितरित करण्यात आला. मात्र, त्याचा औद्योगिक वापर न करता नियमांचे उल्लंघन करून बार, र
राज्यातील होर्डिंग्जचे आता दरवर्षी ऑडिट केले जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी याबाबत विधानसभेत ग्वाही दिली.
कोकणचा विकास म्हणजे केवळ मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपला निसर्ग जपत पुढे जाण्याचा प्रवास आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान घेऊन येत आहे, ग्लोबल कोकण महोत्सव २०२५, दिनांक ६ मार्च ते ९ मार्च दरम्यान नेस्को ग्राउंड, गोरेगाव (मुंबई) येथे हा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उद्योग मंत्री उदय सामंत भूषवणार असून, या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले असणार आहेत. या महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे माहिती तं
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील " असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिम्मित आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मराठी भाषेला सातासमुद्रापार नेण्यास हातभार लावणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या नावाने त्यांच्या मूळ गावी शिरवाडे-वणी येथे कुसुमाग्रज महोत्सव होणार आहे. हा महोत्सव पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार असून तो दोन दिवस चालेल अशी घोषणा उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली.
(Marathi) मराठी ही जागतिक भाषा आहे. जगातील 12 कोटी लोक ही भाषा बोलतात. जगभरात मराठीचे पाईक असलेले शिलेदार तुम्हाला सापडतील. ही व्यवहाराची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, तंत्रज्ञानाची भाषा आहे, अध्यात्माची भाषा आहे, संवादाची भाषा आहे आणि वेळ पडलीच, तर ‘हर हर महादेव’ म्हणत रणगर्जना करण्याचीही भाषा आहे. ‘एआय’पासून सर्व प्रवाह या भाषेने तत्काळ आत्मसात केले आणि म्हणून ही भाषा आज टिकून आहे, वृद्धिंगत होत आहे.
(Uday Samant Meet Raj Thackeray) राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी शनिवारी दि. २२ फेब्रुवारीला सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
भविष्यात आम्हाला भास्कर जाधवांचे मार्गदर्शन मिळणार असेल तर स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली होती.
आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी, असे आदेश उबाठा गटाच्या खासदारांना आलेत. भविष्यात जेवण काय करायचे? याबाबतचे येऊ शकतात, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुक हाच खरा संजय राऊतांचा पोटशूळ आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला.
उबाठा गटाचे आणि मविआचे १० ते १२ आमदार टप्प्याटप्प्याने शिंदेंचे नेतृत्व स्विकारणार, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
संजय राऊतांचे विधान हा राजकीय बालिशपणा आहे, असे प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले. ते सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला.
पुढच्या ८ दिवसांत उबाठा गटातून शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला काही समाजकंटकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशातच आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे की जर का उद्योजकांना खंडणीसाठी कुणा माफियाने किंवा गुंडाने धमकी दिल्यास त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन त्यावर बोलावे, सरकार त्या उद्योजकांना संरक्षण देईल. दहशत माजवणाऱ्या अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे असे मत त्यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
उबाठा गटाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला नाही तर राजकारणात टिकणार कसे? अशी प्रतिक्रिया उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उबाठा गटाने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
Marathi language ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना आज दि : ८ जानेवारी २०२५ रोजी जारी केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे सोमवारी बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दोघेही परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरभरून मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींना ( Ladki Bahin ) देवाभाऊंनी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) पहिल्याच अधिवेशनात विशेष भेट देऊ केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवार, दि. १६ डिसेंबर रोजी तब्बल ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी ३ हजार १५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी : बांगलादेशात ( Bangladesh ) हिंदू व अल्पसंख्याकांवर घडत असलेल्या अत्याचाराविरोधात आता संपूर्ण भारत आवाज उठवत आहे. राष्ट्रीय मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशात घडणाऱ्या घटनेप्रकरणाविरोधात मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये रत्नागिरी शिवसेना आमदार उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी बांगलादेशात भारतीय अल्पसंख्यांकांवर जो अन्याय होत आहे तो निषेधार्ह असल्याचे सांगून केंद्रसरकारकडे बांगलादेशची परिस्थिती
जर एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार की, नाही याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, यावर आता उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांचा सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजीपासून पालघर ते सिंधुदुर्ग असा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध नागरिक त्यांचे मनोमन स्वागत करत असून ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत कमळ फुलणार असा आशीर्वाद देत आहेत.
एकीकडे विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. सोमवारी मध्यरात्री त्यांनी ही भेट घेतली असून त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही.
उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्वाचे आहे. हेलिकॉप्टर सेवा, टुरिस्ट सर्कीट तयार केल्यास मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये, यासाठी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, दि. १० जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले. आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहीर, ॲड.अनिल परब, प्रवीण दटके आदींनी सहभाग घेतला.
बेस्टमधील भंगार भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी सभागृहात केली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शेलारांनी बेस्ट बसमधील भंगार घोटाळ्याचा प्रश्न सभागृहात मांडला. दरम्यान, यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
“मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे काम मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत रुग्णखाटा, तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, व्हेंटिलेटर, इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेचे पैसे कुठे जातात? सायन रुग्णालयाचा पुनर्विकास कधी होणार?” असा प्रश्न भाजप आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी विधानसभेत विचारला.
नुकतीच भाजपची आणखी एक यादी जाहीर झाली असून यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या जागेसाठी उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संजय राऊतांची रोज सकाळची पत्रकार परिषद आपण एवढी गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. याबद्दल उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. ते शनिवारी माध्यमांशी संवाद साधत होते.
उबाठा गटाचे ८ आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट घडवून देणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत सध्या रामटेक दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.
"एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार जेव्हा गुवाहाटीला होते, तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तेथे येण्यासाठी तयार होते. मात्र, आम्ही भास्कर जाधव यांना पक्षात न घेण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यांच्यासारखे व्यक्ती आपल्या सोबत नको, अशी भूमिका मी मांडली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना येऊ दिले नाही," असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक सुचक ट्विट केलं आहे.
बहुचर्चित कोस्टल रोडचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या आठ दिवसांत सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी विधानपरिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते.