ज्योती मल्होत्राची सुटका नाहीच! न्यायालीयन कोठडीत १४ दिवसांची वाढ; सुनावणीत काय घडलं?
24-Jun-2025
Total Views | 20
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सोमवार, २३ जून रोजी हिसार न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी ज्योती मल्होत्रा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेएमआयसी हजर झाली होती.
ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी एजंट्सोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी हिसार पोलिसांनी १६ मे रोजी तिला अटक केली होती. दरम्यान, २३ जून रोजी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यानंतर तिने जामीनासाठी अर्जदेखील केला होता. परंतू, न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला.
सोमवारी झालेल्या सुनावणीत ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. ज्योती मल्होत्रावर १९२३ च्या अधिकृत गुपिते कायदाच्या कलम ३ आणि ५ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.