इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची G-7 मधील प्रतिक्रिया व्हायरल! म्हणाल्या...

    18-Jun-2025
Total Views |


Meloni

कॅनडा
: कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील कॅनानास्किस येथे दिनांक १६ आणि १७ जून २०२५ रोजी झालेल्या जी-७ शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील एक व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. परिषदेच्या एका सत्रात मॅक्रॉन आणि मेलोनी एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. मॅक्रॉनने मेलोनीशी हसत गप्पा मारल्या, त्यावर मेलोनीने त्यांना पाहिले आणि डोळे फिरवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या दोन्ही नेत्यांमधील तणावाचे मुख्य कारण म्हणजे गर्भपाताच्या अधिकारांबद्दलचा मुद्दा. मॅक्रॉन आणि इतर काही नेत्यांनी जी-७ च्या घोषणापत्रात 'सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात' या शब्दांचा समावेश करण्याची मागणी केली होती. इटलीने या शब्दांचा समावेश करण्यास विरोध केला.या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले.

मॅक्रॉनयांनी जी-७च्या व्यासपीठाचा वापर निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी केला हे मेलोनींना खटकले. मेलोनी म्हणाल्या की,"जी-७ सारख्या महत्त्वाच्या मंचाचा उपयोग निवडणुकीसाठी करणे चुकीचे आहे." मॅक्रॉन यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे जी-७ शिखर परिषदेचे वातावरण तणावपूर्ण झाले. परिषदेत इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.नेत्यांनी इराणला कधीही अणुबॉम्ब मिळू नये, या बाबतीत एकमत दर्शवले. गाझा पट्टीतील संघर्ष थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.

या व्हायरल व्हिडिओमुळे मेलोनी आणि मॅक्रॉन यांच्यातील तणाव जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावरती या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक मेलोनींच्या प्रतिक्रियेचे समर्थन करत आहेत, तर काही लोक मॅक्रॉन यांच्या बाजूने आहेत.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121