ब्रेकिंग! अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

    30-May-2025
Total Views | 79
 
nile
 
मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेला निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
 
निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि नणंद करीश्मा हगवणे यांचा मित्र आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नणंदेने निलेशकडे तिचे ९ महिन्यांचे बाळ सोपवले होते. वैष्णवीच्या माहेरची मंडळी ते बाळ ताब्यात घेण्यासाठी गेले असता निलेशने त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवत धमकी देऊन परत पाठवले. त्यानंतर २१ मे पासून निलेश चव्हाण फरार झाला होता.
 
हे वाचलंत का? -  जयंत पाटलांवर पक्षातील युवा नेते नाराज! पवारांकडे तक्रार करणार
 
तेव्हापासूनच पोलिस त्याच्या मागावर होते. निलेशच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक पथके पाठवण्यात आली होती. दरम्यान, आता नेपाळमधून त्याला अटक करण्यात आली असून संध्याकाळपर्यंत त्याला पुण्यात आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी निलेश चव्हाणवर गंभीर आरोप केला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच निलेश चव्हाणसुद्धा या कटात सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचा काय सहभाग आहे हे तपासानंतर हळूहळू पुढे येईल. 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121