"गटारातील अर्क...!", नाव न घेता चित्राताईंनी राऊतांवर केली टीका

    16-May-2025
Total Views | 47
 
Chitra Wagh & Sanjay Raut
 
मुंबई : गटारातील अर्क अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांचे नाव न घेता केली आहे. संजय राऊतांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता चित्रा वाघ यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत राऊतांवर टीका केली.
 
हे वाचलंत का? - 'ही' दलाली कशासाठी? मंत्री संजय शिरसाट यांचा राऊतांना सवाल
 
संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काही दावे केले आहेत. मात्र, यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. राऊतांच्या या पुस्तकाबद्दल बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गासारख्या महाराष्ट्राला अशा 'मनोहर कहानियां' लिहून नासवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत. खरेतर 'गटारातील अर्क' असे नाव संबंधित लेखकाला अधिक शोभून दिसले असते," असा घणाघात त्यांनी राऊतांचे नाव न घेता केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121