म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन

    01-May-2025
Total Views | 11
म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन

मुंबई, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज ध्वजवंदन करण्यात आले.

याप्रसंगी खेरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक व म्हाडातील सुरक्षारक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी  मिलिंद शंभरकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी  मिलिंद बोरीकर, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल वानखडे, 'म्हाडा'च्या सचिव श्रीमती नीलिमा धायगुडे, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी  उमेश वाघ, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी श्रीमती वंदना सूर्यवंशी, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी  सतीश भारतीय, उपमुख्य अभियंता सुधीर पाटील, उपमुख्य अभियंता किशोरकुमार काटवटे, उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी , उपमुख्य अभियंता  दामोदर सूर्यवंशी, उपमुख्य अभियंता संतोष बोबडे, दक्षता व सुरक्षा अधिकारी  महेश चव्हाण, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवाडे आदींसह म्हाडातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्संजीव जयस्वाल यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच म्हाडातील कर्मचार्‍यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण देखील केले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121