जगातील इंटरनेट युजर्सना चॅटजीपीटीची भुरळ! इंस्टाग्राम, टिकटॉकला टाकले मागे

सर्वात जास्त डाऊनलोड झालेले अॅप ठरण्याचा मान

    12-Apr-2025
Total Views |
gpt
 
 
नवी दिल्ली : जगातील सर्वच इंटरनेट युजर्सवर चॅटजीपीटीचे गारुड पसरले आहे. नवीन आलेल्या घिबली या नवीन फीचरमुळे चॅटजीपीटीची लोकप्रियता अफाट वाढली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सर्वात जास्त डाऊनलोड झालेले अॅप ठरले आहे. या स्पर्धेत चॅटजीपीटीने इंस्टाग्राम, टिकटॉकला मागे टाकले आहे. त्यामुळे जगातील इंटरनेट युजर्सची पहिली पसंती आता चॅटजीपीटी असणार आहे.
 
घिबली या आपल्या नवीन रुपात रुपांतरित करणाऱ्या या नवीन फीचरची लोकप्रियता जबरदस्त झाली आहे. जगातील असंख्य युजर्सना त्याने वेड लावले आहे. आपल्याला नवीन रुपात बघण्याच्या या वेडाने जगातील तब्बल ४ कोटी ६० लाख युजर्सनी चॅटजीपीटी डाऊनलोड केले आहे. जगातील सर्व अॅप्सच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या अहवालात म्हटल्याप्रमाणे यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
 
टिकटॉक, इंस्टाग्राम यांच्यापेक्षा सर्वात जास्त डाऊनलोडिंगचा मान मिळवला आहे. जगातील तब्बल १३ लाख आयफोनधारक तर ३३ लाख अँड्रॉइड फोनधारकांनी चॅटजीपीटी डाऊनलोड केले आहे. याउलट टिकटॉक अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ४ कोटी ५० लाख लोकांपर्यंत गेली आहे. फेब्रुवारी ते मार्च या एका महिन्याच्या काळात चॅटजीपीटी डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ही २८ टक्क्यांनी वाढली. २०२५ च्या तिमाहीची तुलना जर २०२४ च्या पहिल्या तिमाहीशी करता १४८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
या जबरदस्त कामगिरीबद्दल प्रतिक्रिया देताना चॅटजीपीटीची मालक कंपनी ओपन एआय या कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ब्रॅड लाइटकॅप यांनी सांगितले की चॅटजीपीटीच्या इमेज तयार करण्याच्या घिबली या नव्या फीचरमुळे जबरदस्त लोकप्रियता वाढली आहे. आता पर्यंत १३ कोटी युजर्सकडून ७० कोटींपेक्षा जास्त घिबिली इमेज बनवल्या आहेत. त्यामुळे जगातील सर्वात लोकप्रिय अॅप बनले आहे.