तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला तिसरा अहवाल सादर!

    11-Apr-2025
Total Views |
 
Tanisha  Bhise
 
मुंबई : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू अन्वेषण समितीचा चौकशी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणातील तिन्ही अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले असून यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांची मागणी केल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, राज्य शासनाचा आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्तालय आणि माता मृत्यू अन्वेशन समिती या तीन समित्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
  
हे वाचलंत का? - सेन्सॉर बोर्डाला 'तो' अधिकार नाही! फुले वाड्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
 
या तिन्ही समित्यांनी आपापला चौकशी अहवाल राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आले आहेत. या अहवालातून काय निष्कर्ष निघतो? यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे का? या सगळ्याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.