जातीपातीचे राजकारण करून सामाजिक विभाजनाचा काँग्रेसचा छुपा अजेंडा - संजय निरुपम

- ओबीसी मतांसाठी केलेला ठराव निंदनीय

    10-Apr-2025
Total Views | 13

 
 sanjay nirupam on congress
 
मुंबई: ( sanjay nirupam on congress ) ओबीसी मतांसाठी काँग्रेसने केलेला ठराव निंदनीय आहे. अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेशी पूर्णपणे युटर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात ठराव न करता, काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांची गुरुवार, दि. १० एप्रिल रोजी केली.
 
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम म्हणाले की, काँग्रेस पक्षाची आजवर जी काही राष्ट्रीय अधिवेशन झाली त्यात देशासाठी, ग्रामस्वराज्यासाठी, आर्थिक उदारीकरणासाठी, बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे ठराव मंजुर केले होते. प्रत्येक अधिवेशनात काँग्रेसकडून भारतीय समाजात जाती, भाषा धर्माच्या नावाने विभक्त करणाऱ्या शक्तींचा विरोध करणारा ठराव केला जात होता, असे निरुपम म्हणाले.
 
मात्र अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने पूर्णपणे यू-टर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात काँग्रेसने कोणताच ठराव केला नाही. याउलट काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याचा काँग्रेसचा छुपा अजेंडा असून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
 
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसची वाटचाल प्रादेशिक पक्षाच्या दिशेने सुरु झाली आहे. प्रादेशिक पक्षांकडून जाती धर्माचा आधारे व्होटबँकेचे राजकारण केले जाते, त्याप्रमाणे काँग्रेस राजकारण करणार हे निंदनीय आहे. ओबीसी मतांसाठी केलेला ठराव म्हणजे काँग्रेसचे दळभद्री राजकारण आहे, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली.
 
आदित्य ठाकरेंकडून कंत्राटदारांवर दबाव
 
काँग्रेसच्या जाती-जमातीवर आधारीत ठरावाला उबाठाची सहमती आहे का, असा सवाल निरुपम यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की मागील २५ वर्ष मुंबई महापालिकेवर उबाठाची सत्ता होती मात्र कधीही ते नालेसफाईची कामे पाहण्यासाठी गेले नाहीत. या उलट त्यांनी रस्त्यांची कामे, नालेसफाई आणि इतर कामांमधून कमिशन घेतले.
 
आता सत्ता गेल्याने आदित्य ठाकरे रस्ते आणि नालेसफाईची कामे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कामाची पाहणी करताना आदित्य ठाकरेंकडून कमिशन मिळवण्यासाठी कंत्राटदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय निरुपम यांनी व्यक्त केला. नालेसफाईच्या कामांची पाहणी हे आदित्य ठाकरेंचे ढोंग आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईत शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले, ज्यामुळे मुंबई खड्डेमुक्त झाल्याचे दिसून येते, असे निरुपम म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121