प्रामाणिकपणे कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य : सी. पी. राधाकृष्णन

मुंबईत महावीर जयंती उत्साहात साजरी

    10-Apr-2025
Total Views | 17
 
C. P. Radhakrushnan
 
मुंबई : प्रामाणिकपणे कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य असून कर भरणे ही समाजसेवा आहे, त्यामुळे सर्वांनी अवश्य कर भरायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवार, १० एप्रिल रोजी केले.
 
भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे आयोजित 'महावीर स्वामी जन्म कल्याणक' महोत्सव मुंबईतील योगी सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जैन साध्वी प्रियंवदा, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, भारत जैन महामंडळ संस्थेचे अध्यक्ष सी सी डांगी, माजी अध्यक्ष तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.
 
 
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, "अर्थसंकल्प जाहीर झाला की, बहुतांश लोक आणि व्यापारी वर्ग आयकराबद्दल बोलत असतात. आपण कर भरला नाही तर देशाच्या सीमेवरील जवानांची काळजी घेता येणार नाही. तसेच रस्ते किंवा महामार्ग अशी नहिताची कामे करता येणार नाही. प्रामाणिकपणे कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य आहे. कर भरणे ही समाजसेवा आहे, त्यामुळे सर्वांनी अवश्य कर भरला पाहिजे. मृत्यू अटळ आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. भौतिक सुखाला कधीही सीमा नसते. कितीही पैसे कमवा, घरे बांधा, बँक ठेवी जमा करा, परंतू, त्यामुळे समाधान होणार नाही. त्यामुळे जीवन समाजासाठी आणि लोकसेवेसाठी व्यतीत केले पाहिजे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "एके काळी तामिळनाडू राज्यातील दोन तृतीयांश लोक भगवान महावीरांची शिकवण पाळत होते. तमिळ भाषेतील पाच महाकाव्यांपैकी दोन महाकाव्ये जैन मुनींनी लिहिली आहेत. जैन धर्माचा देशाचा जनमानसावर मोठा प्रभाव आहे," असेही राज्यपालांनी सांगितले.
 
मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन : पीयूष गोयल
 
याप्रसंगी बोलताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, "अहिंसेचा पुरस्कार करताना दुष्ट प्रवृत्तींना शासन करणेदेखील महत्वाचे असते. केंद्र शासनाच्या प्रयत्नामुळे अतिरेकी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होत आहे. केंद्र शासनाने नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा विडा उचलला असून मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल. देशातील १६० जिल्ह्यांपैकी आज केवळ १२ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद शिल्लक आहे," असे त्यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121