लखनऊ : मुघलशासक औरंगजेबाची स्तुतीसुमने उधळणाऱ्या औरंग्याची औलाद असणाऱ्या अबू आझमीला (Abu Azmi) महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित राहणार आहेत. याचपार्श्वभमीवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमीला उत्तर प्रदेशात पाठवा बाकी आम्ही त्यांच्यावर उपचार करू, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
सपाचे आमदार आबू आझमी यांनी औरंगजेब हा तत्कालीन चांगला प्रशासक होता. सध्याच्या सरकारहून त्यावेळी त्याचा जीडीपी २४ टक्के असल्याचे बेताल वक्तव्य आझमींनी केले. तसेच त्यांच्या काळातच भारताला सोने की चिडीया म्हटले जात होते, असे वक्तव्य आझमींनी केले होते.
त्यांच्या या विधानाने सोशल मीडिया आणि विधिमंडळाच्या सभागृहात एकच गदारोळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, आता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आझमीचे निलंबिन करण्याची आणि त्यांच्याविरोधात देशद्रोहाचे आरोप करण्याची मागणी केली. मंगळवारी आझमी यांनी त्यांच्या एक्स ट्विटरला संबोधित करताना म्हटले की, त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.
#WATCH | Lucknow: On Samajwadi party MLA Abu Azmi's statement on Aurangzeb, which he later withdrew, UP CM Yogi Adityanath says, " Remove that person from (Samajwadi) party and send him to UP, we will do his treatment. The person who feels ashamed about the heritage of… pic.twitter.com/SHXClYoyaz
मात्र, आता योगी आदित्यनाथ यांनी आझमींनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, त्यांना पक्षातून काढून टाका आणि त्याला उत्तर प्रदेशात पाठवा. आम्ही तुमच्यावर चांगलाच उपचार करू, ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान बाळगण्याऐवजी लाज वाटते, जो औरंगजेबाला आपला आदर्श मानतो, त्याला आपल्या देशात राहण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच याचे उत्तरही दया असे ते म्हणाले आहेत.