सिडको एम्प्लॉईज यूनियनची निवडणूक

प्रगती पॅनल विजयी अध्यक्षपदी नरेंद्र हिरे

    03-Mar-2025
Total Views |

cidco
 
नवी मुंबई : ( CIDCO Employees )  नवी मुंबईतील ‘सिडको एम्प्लॉईज युनियन’च्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रगती पॅनलचा दणदणीत विजयी झाला आहे. सलग २० वर्षे प्रगती पॅनलने युनियनवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
 
नुकत्याच झालेल्या ‘सिडको एम्प्लॉईज युनियन’च्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रगती पॅनलचे नरेंद्र हिरे अध्यक्ष, तर सरचिटणीसपदी नितीन कांबळे, उपाध्यक्षपदी संजय पाटील, प्रमोद पाटील, चिटणीसपदी यतिष पाटील, खजिनदारपदी सुभाष पाटील, सह चिटणीसपदी सुधीर कोळी, रवींद्र डोंगरे, सुबोध भोईर व कार्यकारिणी १५ सदस्य निवडून आले आहेत.
 
‘सिडको’ महामंडळातील आव्हाने पाहता एक सक्षम युनियन निवडून देणे खूप गरजेचे होते. समता पॅनलचा धुव्वा उडवून ‘सिडको’ कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा प्रगती पॅनलवर विश्वास ठेवला. ‘सिडको एम्प्लॉईज युनियन’ही महाराष्ट्रातील एक बलाढ्य कामगार संघटना म्हणून ओळखली जाते.