नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले असून, सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आता आम आदमी पक्षाच्या नेत्यांमागे चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. आप चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला भरण्या इतपत पुरावे आमच्याकडे आहेत असा दावा सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. दिल्ली सरकारच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता जैन यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध मांडण्यात येणाऱ्या आरोपपत्राबाबत न्यायालयाने ईडीकडून स्पष्टीकरण मागितले तसेच, सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांना प्रश्न सुद्धा विचारण्यात आले. ३० मे २०२२ रोजी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने जैन यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याशी जोडले गेलेल्या ४ कंपन्या कथित घोटाळ्यामध्ये सामील झाल्या होत्या. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी मात्र सुनावणीला विलंब झाल्यामुळे त्यांना जामीन मिळाला होता. या संदर्भात दिल्लीच्या उच्च न्यायालयात पुढती सुनावणी २३ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.