महिलांच्या मनात असलेली भीती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय : उपराष्ट्रपती धनखड

    31-Aug-2024
Total Views |
vice president jagdeep dhankhar


नवी दिल्ली :         आपल्या कन्या आणि महिलांच्या मनात असलेली भीती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. तसेच, सर्व महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे उपराष्ट्रपतींनी आवाहन करताना महिलांवरील हिंसाचाराला ‘लक्षणात्मक आजार’ म्हणून संबोधले गेल्याचे सांगताना उपराष्ट्रपतींनी तीव्र निषेध केला आहे.

दरम्यान, दिल्ली विद्यापीठाच्या भारती महाविद्यालयात ‘विकसित भारतातील महिलांची भूमिका’ या विषयावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “मी अवाक झालो आहे; सर्वोच्च न्यायालयाचा बार सदस्य, खासदार अशा पद्धतीने वागतो याचे मला दुःख आणि काहीसे आश्चर्य वाटते. किती लज्जास्पद आहे! अशा भूमिकेचा निषेध करण्यात माझे शब्द अपुरे आहेत. हा त्या उच्च पदासमवेत सर्वात मोठा अन्याय आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींच्या “बास आता खूप झाले” या आवाहनाचा पुनरुच्चार करण्याचे आवाहन नागरिकांना करून धनखड म्हणाले, “राष्ट्रपतींनी सांगितले आहे, बास आता खूप झाले!” चला, पुरे झाले म्हणूया. हे आवाहन राष्ट्रीय आवाहन व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाने या आवाहनात सहभागी होत चला संकल्प करूया, एक व्यवस्था निर्माण करूया, यापुढे, एखाद्या मुली किंवा महिलेवर अत्याचार करणाऱ्याला थारा नसेल, सहिष्णुता नसेल, असेही ते यावेळी म्हणाले.