पॅरा शुटर स्वरुप उन्हाळकर यांना ५० लाखांचे सहाय्य

    30-Aug-2024
Total Views |

Swaroop Unhalkar
 
मुंबई पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेकरिता पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील खेळाडू स्वरुप उन्हाळकर (Swaroop Unhalkar) (पॅरा शुटींग) यांना ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला.
 
पॅरीस आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करण्याकरिता 'मिशन लक्ष्यवेध' या योजनेच्या माध्यमातून मदत करण्याची घोषणा अलिकडेच करण्यात आली होती. त्यानुसार, या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांकरिता पात्र ठरलेल्या राज्यातील खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपये या प्रमाणे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार, स्वरुप उन्हाळकर यांना उपरोक्त सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.