कोकणात राडा! राणे विरुद्ध ठाकरे आमने-सामने

    28-Aug-2024
Total Views |

Thackeray & Rane
 
 
सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर बुधवारी दोन गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले असून त्यांच्यात जोरदार राडा झाला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बुधवारी निषेध आंदोलन केले. याचवेळी भाजपचे कार्यकर्तेही तिथे दाखल झाले आणि दोन गट आमनेसामने आले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आली होती. महाविकास आघाडीचे नेते मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या पाहणीसाठी दाखल झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते होते. त्याचवेळी खासदार नारायण राणे आणि निलेश राणेदेखील या किल्ल्यावर दाखल झाले. दरम्यान, यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात जोरदार राडा झाला.आदित्य ठाकरेंच्या समोरच हा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने याठिकाणी शांतता निर्माण झाली.