शिवरायांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करणार - मुख्यमंत्री

    26-Aug-2024
Total Views |

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
 
मुंबई ;  छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. झालेली घटना दुर्दैवी आहे. हा पुतळा नौदलाने उभारलेला होता. त्याचे डिझाईन देखील त्यांनीच तयार केले होते. मात्र ४५ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहत असल्याने पुतळा पडला आणि त्याचे हे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौदलाचे अधिकारी उद्या त्याठिकाणी भेट देतील आणि करणे तपासतील. ही घटना कळल्यानंतर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना तेथे पाठवले. आम्ही या घटनेमागील कारणे शोधून काढू आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.