देशात ६ जी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकारच्या हालचाली; केंद्रीय मंत्र्यांनी केले बैठकीत आवाहन
24-Aug-2024
Total Views |
मुंबई : देशात ६जी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे. दूरसंचार सेवा प्रदात्यांसह सल्लागार समितीच्या दुसऱ्या बैठकीत त्यांना ६ जी तंत्रज्ञानाच्या विकासात पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.दूरसंचार कंपन्यांनी परवाना परवानग्या सुलभ करणे, विजेचे दर तर्कसंगत करणे आणि कोणत्याही क्षेत्रातील शुल्क कमी करणे या जुन्या मागण्यांचा पुनरुच्चार सिंधिया यांनी केला.
दरम्यान, दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या सल्लागार गटासह एक बैठक यशस्वी झाली असून केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सेवांचा दर्जा, भारताचा ६ जी दृष्टीकोन व संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आपल्या क्षेत्राला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. देशात ६ जी आणण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी टेलिकॉम कंपन्यांना आवाहन केले आहे.
या बैठकीत दळणवळण राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर, दूरसंचार सचिव नीरज मित्तल, डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशनचे सदस्य (वित्त) मनीष सिन्हा आणि दूरसंचार विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. रिलायन्स जिओचे व्यवस्थापकीय संचालक पंकज पवार, व्होडाफोन आयडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) अक्षय मुंद्रा, बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट जे रवी, तेजस नेटवर्कचे अध्यक्ष एनजी सुब्रमण्यम आणि सीओएआयचे महासंचालक एसपी कोचर हेही या बैठकीला उपस्थित होते.