वसंत मोरे उबाठा गटात दाखल!

    09-Jul-2024
Total Views | 43
 
Vasant More
 
मुंबई : मनसे आणि वंचित बहुजन आघाडी असा प्रवास केल्यानंतर आता वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीकडून यंदाची लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
 
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडल्याबद्दल शिक्षा तर मिळालयाच हवी, ती वसंत मोरेंनाही मिळायला पाहिजे. मी वसंत मोरेंसह तुम्हालाही शिक्षा देतोय. मला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाढवून पाहिजे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  ब्रेकिंग! वरळी हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपीला अटक
 
तसेच याप्रसंगी वसंत मोरे म्हणाले की, "मी पुन्हा एकदा शिवसेनेत आलो असून स्वगृही आल्याचा प्रचंड आनंद आहे. २००६ साली मी उपविभागीय अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला होता. पण आज स्वगृही परतत असताना माझ्यासोबत ५ उपविभागीय अध्यक्ष, १७ शाखाध्यक्ष, १ शहराध्यक्ष आणि २ सचिव होते," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121