मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत नाना पटोलेंची एन्ट्री! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

    06-Jul-2024
Total Views |
Nana Patole MCA

मुंबई :
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे नुकतेच हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे एमसीएत अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इन्ट्री केली आहे. पटोलेंनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान दि. २३ जुलै रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे एमसीएच्या निवडणुकीत त्यांना मतदाना हक्क बजावता येणार आहे. त्यामुळेच पटोले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दि. २ जुलै रोजी त्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात महत्त्वाची असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक रंगतदार होणार आहे.