ठाण्याची हाजुरी महाआरतीने दुमदुमली

हाजुरीतील शिवमंदिरात उठले हिंदूंचे मोहोळ

    05-Jul-2024
Total Views |

Thane
 
ठाणे : मंदिराची विटंबना करून हिंदू बांधवांची मुस्कटदाबी करणार्‍या मुस्लीम जिहादींविरोधात एकवटलेल्या हिंदूंचे मोहोळ गुरुवार, दि. 4 जुलै रोजी ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील हाजुरी परिसरात उठले. हाजुरीतील शिवमंदिरात ‘सकल हिंदू समाज’ तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर गुरुवार, दि. 4 जुलै रोजी पार पडलेल्या महाआरतीला शेकडो भाविक उपस्थित होते.
 
यावेळी भाजपचे मा. नगरसेवक भरत चव्हाण, सरचिटणीस वलास साठे, ‘सकल हिंदू समाजा’चे विजय त्रिपाठी आदींसह ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. भाविकांनी शिवमंदिरात अभिषेक करून महाआरती केली.