मेक इन इंडियामुळे भारतीय लष्कराला मिळाले मोठे बळ; देशात १.२७ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीचे उत्पादन

    05-Jul-2024
Total Views | 106
 Rajnath Singh Defence
 
नवी दिल्ली : २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात १.२७ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे तयार करण्यात आली आहेत. हा संरक्षण उत्पादनातला नवा विक्रम आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, "एका आर्थिक वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक संरक्षण उत्पादन आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा मैलाचा दगड आहे. भारताला जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे."
 
राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया कार्यक्रम नवनवे विक्रम रचत आहे. २०२३-२४ मध्ये भारताने संरक्षण उत्पादनात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. २०२३-२४ देशात १,२६,८८७ कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६.८ टक्के अधिक आहे. या यशाबद्दल राजनाथ सिंह यांनी सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्या आणि संरक्षण उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे अभिनंदन केले.
 
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारने सांगितले की २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशातील संरक्षण उत्पादन १,०८,६८४ कोटी रुपयांचे होते. सरकारने सांगितले की २०२३-२४ मध्ये एकूण संरक्षण उत्पादनापैकी ७९.२ टक्के संरक्षण उत्पादन सरकारी आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी केले आहे. तर २० टक्के उत्पादन खासगी कंपन्यांनी केले आहे.
  
सरकारच्या दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत संरक्षण उत्पादन क्षेत्रात सरकारी धोरणे आणि सुधारणांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०२३-२४ मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीतही वाढ झाली आहे आणि ती या आर्थिक वर्षात २१,०८३ कोटी रुपये होती. हे आर्थिक वर्ष २०२२-२३ पेक्षा ३२ टक्के अधिक आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121