भारतीय लष्कराला सलाम! उरीतील सीमावर्ती गावांमध्ये लष्कराचे मोफत वैद्यकीय शिबिर

    28-May-2025
Total Views | 8
Indian army hosted a free medical for civilians at URI

उरी : भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमधील उरी सेक्टरच्या सीमावर्ती गावांमध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. २६ मे २०२५ रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील नंबला A, B, C, सहोरा, हातलांगा, सिलिकोट, घरकोट, बलकोट, मच्छिक्रंद, बांदी, लगामा, राजारवानी आणि परन पिलान या गावांतील नागरिकांसाठी हे शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

या शिबिरात ५०० पेक्षा अधिक रहिवाशांनी मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि मानसोपचारतज्ज्ञांनी मोफत तपासणी, प्रथमोपचार, मानसिक आरोग्य विषयक माहिती दिली. त्या बरोबरच स्वच्छतेचे महत्व सुद्धा समजावून सांगितले.

या उपक्रमामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अलीकडील शस्त्रसंधी उल्लंघनामुळे काही भागात सुविधा पुरवणे कठीण झाले होते. या भागतील नागरिकांना शिबिरामुळे आवश्यक वैद्यकीय मदत योग्यवेळी उपलब्ध झाली. स्थानिकांनी लष्कराच्या या प्रयत्नांचे आभार मानले. भारतीय लष्कराने अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.
या शिबिरामुळे नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळाल्या आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली. या उपक्रमामुळे लष्कर आणि स्थानिक नागरिकांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत. लष्कराच्या या प्रयत्नांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना आवश्यक मदत मिळाली आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121