‘YRF स्पाय युनिव्हर्स’मध्ये आलिया भट्टची एन्ट्री! जोडीला दिसणार 'मुंज्या' फेम अभिनेत्री

    05-Jul-2024
Total Views |

alia bhatt 
 
 
मुंबई : ‘YRF स्पाय युनिव्हर्स’ अभिनेता शाहरुख खानच्या पठाणमुळे विशेष चर्चेत आहे. याशिवाय टायगर चित्रपटाच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या ‘YRF स्पाय युनिव्हर्स’ मध्ये दीपिका पडूकोण, कैटरिना कैफ यांच्या यादीत आता अभिनेत्री आलिया भट्ट हिची देखील एन्ट्री झाली आहे. या संदर्भात तिनेच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे.
 

alia bhatt 
 
आलिया भट्टने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘अल्फा’ या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून याचं दिग्दर्शन ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रवैल यांचे असणार आहेत. मुंबईत शूटिंग झाल्यावर या चित्रपटाचं काही शूटिंग परदेशात देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय या चित्रपटाची आणकी एक खासियत म्हणजे यात मुंज्या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे. अजून या दोघींची भूमिका नेमकी काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.