नवी दिल्ली : आयएनएस कवरत्ती येथून २३ जून २०२५ ते ७ जुलै २०२५ या कालावधीत एक्सटेंडेड रेंज अँटी-सबमरीन रॉकेट (इआरएसएआर) च्या चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या.
डीआरडीओच्या पुणेस्थित आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) यांनी हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने, भारतीय नौदल जहाजांच्या स्वदेशी रॉकेट लाँचरसाठी इआरएसएआरचे आरेखन आणि विकसित केले आहे.
इआरएसएआर हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पाणबुडीविरोधी रॉकेट आहे जे पाणबुडीशी लढण्यासाठी वापरले जाते आणि भारतीय नौदलाच्या जहाजांच्या ऑनबोर्ड आयआरएलमधून डागले जाते. उच्च अचूकता आणि सुसंगततेसह विस्तृत श्रेणीच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्यात ट्विन-रॉकेट मोटर कॉन्फिगरेशन आहे. यामध्ये स्वदेशी विकसित इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूजचा वापर करण्यात आला आहे. एकूण १७ इआरएसएआरचे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये यशस्वीरित्या चाचणी मूल्यांकन करण्यात आले. रेंज कामगिरी, इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज कार्य आणि वॉरहेड कार्य यासारख्या चाचण्यांचे सर्व निर्दिष्ट उद्दिष्टे यशस्वीरित्या प्रदर्शित करण्यात आली.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हैदराबाद आणि सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड, नागपूर हे इआरएसएआर रॉकेट्सचे उत्पादन भागीदार आहेत. वापरकर्ता चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, भारतीय नौदल लवकरच इआरएसएआर प्रणालीचा समावेश करेल अशी अपेक्षा आहे.