झिका व्हायरसचे राज्यात एकूण आठ रुग्ण

    04-Jul-2024
Total Views |

झीका  
 
मुंबई :राज्यात कोरोना व्हायरस नंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढत आहे. झिका व्हायरसचे गेल्या दोन महिन्यात राज्यात आठ रुग्ण आढळले आहेत. झिंका हा डेंग्यू आणि चिकनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसणारा आजार आहे. हा आजार प्राणघातर नसला तरी सुद्धा झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना मात्र या आजाराचा अधिक धोका असू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
 
झिका व्हायरस नेमका काय आहे ?
१९४७ मध्ये युगांडामधील माकडांमध्ये हे पहिल्यांदा आढळून आले. नंतर, १९५२ मध्ये युंगाडा आणि टांझानियामधील मानवांमध्ये हा आजार संक्रमण झाल्याचे आढळून आले. अफ्रिका, आशिया , अमेरिका या संपूर्ण जगात विषाणूचा प्रादुर्भाव नोंदवला गेला आहे.
१९६० आणि १९८० च्या दशकात, अफ्रिका आणि आशियामध्ये झिका विषाणूंच्या काही दुर्मिळ घटकांची नोंद झाली आहे.
 
तर पहिला विषाणूचा उद्रेक २००७ मध्ये याप नावाच्या बेटावरुन नोंदवला गेला. २०१५ मध्ये ब्राझीलने झिका विषाणू संसर्ग आणि मायक्रोसेफली यांच्यातील संबध नोंदावला. सुमारे ८६ देश या झिका व्हायरसने प्रभावित झाले आहेत. भारतात २०२१ मध्ये झिकाची प्रकरणे नोंदवली आहेत.
 
झिका व्हायरसची लक्षणे :
झिका हा आजार होण्याआधी रुग्णाला पुरळ येणे , ताप त्याचबरोबर डोळ्याच्या बुबुळाच्या पुढील भागाला प्रचंड दाह होणे, स्नायु व सांधेदुखी , अस्वस्थता जाणवणे आणि डोकेदुखी अशाप्रकारची लक्षणे तिव्रतेने जाणवतात.
 
राज्यातील झिकाचे एकूण रुग्ण
महाराष्ट्रात डासांमार्फत पसरणारा झिकाचा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये आढळला होता तेव्हापासून ३ जुलै २०२३ पर्यंत राज्यात झिकाच्या २९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी २०२४ ते आजपर्यंत यंदाच्या वर्षी राज्यात झिका व्हायरसच्या ८ रुग्णांची नोंद झाली आहे.