कला-भक्तीचे दर्शन घडवणारे ‘भक्ति: ‘द आर्ट ऑफ कृष्णा’ प्रदर्शन

    29-Jul-2024
Total Views |
bhakti 
 कला आणि भक्तीचे दर्शन घडवणारे ‘भक्ति: ‘द आर्ट ऑफ कृष्णा’ प्रदर्शननीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (एनएमएसीसी) कला आणि भक्ती यांचे दर्शन घडवणाऱ्या ‘भक्ति: ‘द आर्ट ऑफ कृष्णा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राजा रवि वर्मा, एम. एफ. हुसैन, अमित अंबालाल, रकीब शॉ आणि थुकराल यांसारख्या दिग्गज भारतीय कलाकारांच्या एकूण १०७ कलाकृतींचे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चित्रे, शिल्पे आणि ऐतिहासिक वस्तु अशा अनेक कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या आहेत. १८ जुलै पासून सुरू झालेले हे प्रदर्शन १८ ऑगस्ट पर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे.
बालकृष्ण, गोकुळात खेळणारा कृष्ण, वेगवेगळे अवतार धारण केलेला कृष्ण, अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण, यादवांचा राजा कृष्ण अशी भगवान श्रीकृष्णांची रुपांचे दर्शन या प्रदर्शनामध्ये घडणार आहे.