राज्यात सरासरीच्या 123 टक्के पाऊस

पेरण्या समाधानकारक

    24-Jul-2024
Total Views |
 
Perni
 
मुंबई : राज्यात सरासरीच्या 123.2 टक्के पाऊस झाला असून पेरण्यादेखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण मंगळवार, दि. 23 जुलै रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात दि. 22 जुलैपर्यंत 545 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास 422 मिमी म्हणजेच सरासरीच्या 95.4 टक्के पाऊस झाला होता.
 
राज्यात खरीपाचे ऊस वगळून 142.2 लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 128.94 लाख हेक्टर क्षेत्रावर (91 टक्के) पेरणी झाली आहे. भात व नाचणीपिकाची पुनर्लागवड कामे सुरू असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता आहे.
 
पाणीसाठा किती आहे?
सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये 39.17 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 43.65 टक्के पाणीसाठा होता. सर्वात कमी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर येथे, तसेच 28.34 टक्के नाशिक येथे आहे. राज्यातील 1 हजार, 21 गावे आणि 2 हजार, 518 वाड्यांना 1 हजार, 365 टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर्सची संख्या 326ने वाढली आहे.