नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

    09-Jun-2024
Total Views |
pm narendra modi oath nda govt


नवी दिल्ली :    नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून एनडीएच्या खासदारांनी मंत्रीपदाची शपथदेखील घेतली आहे. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात द्रौपदी मुर्मु यांनी पदाची व गोपनीयतेची शपथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, दिल्ली येथे राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला असून सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या काळात ज्या प्रमाणे विकास कामे केली आहेत तशीच विकासकामे येत्या कार्यकाळात ही केली जातील अशी ग्वाही यापूर्वीच त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या काळात ज्या प्रमाणे विकास कामे केली आहेत तशीच विकासकामे येत्या कार्यकाळात ही केली जातील अशी ग्वाही यापूर्वीच त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून पीयूष गोयल यांनीदेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. याशिवाय शिवसेना खा. प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.