लव्ह जिहाद! इन्स्टाग्रामवर ओळख; बलात्कार अन् बळजबरीने धर्मांतरण; कटात मौलवीचाही समावेश

    09-Jun-2024
Total Views |
 LOVE JIHAD
 
जयपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातून लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणीवर तरुणाने बलात्कार केला, नंतर तिला इस्लाम धर्म स्विकारायला लावून तिच्याशी लग्न केले. बुधवार, दि. ५ जून २०२४ हे धर्मांतर करण्यात एका मौलवीचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना जोधपूरच्या प्रताप नगर सदर पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथे पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत मुलीने सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर एका मुलाशी ओळख झाली होती. मुलगी आणि मुलगा दोघेही रील बनवायचे. दोघांनाही एकमेकांची रील आवडू लागली. नंतर दोघेही बोलू लागले. काही वेळाने दोघांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली.
 
 
यादरम्यान तरुणाने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तरुणीने विरोध केल्यावर तिला लग्नाच्या बहाण्याने गप्प करण्यात आले. ५ जून रोजी आरोपीने मुलीला लग्नासाठी बोलावले. येथे एक मौलवीही उपस्थित होता. यानंतर पीडितेला लग्नापूर्वी इस्लाम स्वीकारण्याची अट घालण्यात आली. यानंतर मुलीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. लग्नानंतर पीडितेचे नावही बदलण्यात आले. मुलीने घरी पोहोचून संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली.
 
ही बाब कळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. ते तरुणीला घेऊन जोधपूरमधील प्रताप विहार सदर पोलीस स्टेशनला पोहोचला. येथे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएचओ सतीश कुमार यांनी मीडियाशी बोलताना तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आणि मुलीने केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.