लोकसभा निवडणूक २०२४ चा पहिला निकाल आला; 'या' वादग्रस्त उमेदवाराचा दारूण पराभव

    04-Jun-2024
Total Views |
 Prajwal Revanna
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाला आला आहे. कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे. हासनमध्ये जेडीएसचे प्रज्वल रेवन्ना आणि काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांच्यात लढाई आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर निवडणूकीच्या आधी महिलांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. त्यामुळे ही जागा देशभरात चर्चेत आली होती. आता त्यांचा १५ हजारहून अधिक मतांनी पराभव झालेला आहे.
 
सुरुवातीलच्या कलानुसार भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये २०१९ च्या तुलनेत कमी जागा मिळत आहेत. याउलट भाजपनं गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या २९ जागा आहेत. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, मध्य प्रदेशात भाजप सर्वच्या सर्व २९ जागांवर आघाडीवर आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला मध्य प्रदेशात २९ पैकी २८ जागांवर विजय मिळवला होता.
  
मध्य प्रदेशबरोबरचं गुजरातमध्ये सुद्धा भाजपनं २६ पैकी २६ जागांवर आघाडी मिळवून आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपनं गुजरातमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे, चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे, पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे, सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडलं होते. त्यानंतर आज दि. ४ जून २०२४ ला मतमोजणी होत आहे.