भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग

    11-Jun-2024
Total Views |

आग
 
ठाणे : ठाण्यानजीकच्या भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे. भिवंडी येथील गोवा नाका सरवली एमआयडिसी भागात मंगळवारी पहाटे कापड गोदामाला भीषण आग लागली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. आठ तासांनी येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या पथकांना यश आले.
 
भिवंडीतील गोवा नाका येथील सरवली भागात कापड निर्मितीचे गोदाम आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आग अधिकच पसरत गेली. घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी, कल्याण आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल होऊन आठ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.