नागी आणि नाक्ती

भारताचे नवे रामसर हिरे

    10-Jun-2024
Total Views |
निसर्गाच्या सर्वात सुंदर लॅण्डस्केप्सपैकी एक असलेल्या रामसर साइट्स, जैवविविधतेचे दीपस्तंभ आहेत. या ठिकाणांवर, निसर्गाच्या विविध घटकांतील परस्परसंवाद सर्वात जवळून अनुभवता येतो. ‘रामसर कन्व्हेन्शन’ अंतर्गत नियुक्त केलेल्या या पाणथळ जागा केवळ जलयुक्त परिसंस्था नसून, पर्यावरणीय सौहार्दाचा पाळणा आहेत. दुर्मीळ वनस्पती आणि जीवजंतुंसोबत अनेक इतर प्रजातींना त्यांचे हक्काचे घर देणार्‍या याच महत्त्वाच्या जागांमध्ये आता बिहारमधील नागी आणि नाक्ती या जागांचा समावेश झाला आहे, त्यांच्याविषयी...


naga wetalnd
'रामसर कन्व्हेन्शन’ हे पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करण्यासाठी अमलात आणलेले आंतरराष्ट्रीय अधिवेशन होते. इराणच्या रामसर शहरात 1971 मध्ये त्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. विविध परिसंस्थांनी नटलेल्या आपल्या भारतामध्ये, रामसर स्थळे जणू भारताच्या नैसर्गिक वारशाच्या मुकुटातील दागिने आहेत. हिमालयातील उच्च उंचीच्या पाणथळ प्रदेशांपासून ते सुंदरबनच्या खारफुटीच्या जंगलांपर्यंत प्रत्येक स्थळ हे संवर्धनासाठी देशाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. या जागा केवळ वन्यजीवांसाठीच नाही, तर त्या जागांवर उपजीविका, पूर-संरक्षण आणि जलशुद्धीकरणासाठी अवलंबून असलेल्या लाखो लोकांसाठीदेखील महत्त्वाच्या आहेत. बिहारमधील नागी आणि नाक्ती पक्षी अभयारण्यांचा नुकताच रामसर साईट्सच्या यादीत समावेश झाला आहे. ही बातमी भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता भारतामध्ये रामसार स्थळांची संख्या 82 झाली आहे. ही नवी दोन रामसार अभयारण्ये, असंख्य पक्ष्यांच्या प्रजातींसाठी महत्त्वाची निवासस्थाने आहेत आणि जलसंवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या जागा पर्यावरणीय स्थिरतेकडे भारताच्या चालू असलेल्या प्रवासात आणि आपल्या ग्रहाच्या मौल्यवान पाणथळ प्रदेशांचे जतन करण्याच्या जागतिक प्रयत्नात महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत.
नागी आणि नाक्ती पक्षी अभयारण्यांबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या दोन्ही जागा खरेतर मानवनिर्मित जलाशये आहेत, जे बिहारच्या जमुई जिल्ह्यातील नयनरम्य झाझा वनक्षेत्रात वसलेले आहेत. परंतु, या दोन्ही जलाशयांसाठी निसर्गाच्या इतर योजना होत्या. आता या जागा फक्त ‘धरणाचे पाणी’ इतक्याच राहिलेल्या नाहीत, तर त्या जीवंत आणि पर्यावरणीय महत्त्व असलेल्या जीवंत परिसंस्था बनल्या आहेत. आज या पक्षी अभयारण्यांबद्दल गप्पा मारूया आणि या आश्रयस्थानांची काही मंत्रमुग्ध करणारी रहस्ये जाणून घेऊया.


नागी पक्षी अभयारण्य
(रामसर साइट क्रमांक 2545)

नागी पक्षी अभयारण्य हे नागी नदीच्या बांधामुळे अस्तित्त्वात आले. येथील स्वच्छ पाणी आणि हिरवीगार पाणवनस्पती यांनी सुशोभित झालेले पाणवठे, विविध प्रजातींसाठी आश्रयस्थान प्रदान करतात. या जलाशयाचे पाणलोटक्षेत्र टेकड्यांनी वेढलेले असून येथे प्रामुख्याने पानझडीची जंगले आहेत. पाणी आणि स्थलीय परिसंस्थेचा नागी अभयारण्यात एक अद्वितीय संयोग बघायला मिळतो. या परिसंस्थेला या प्रदेशात विशेष पर्यावरणीय महत्त्व आहे. नागीमध्ये 75 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी त्यांच्या प्रवासातील महत्त्वाचा थांबा म्हणून ही जागा विलक्षण महत्त्वाची ठरली आहे. त्यापैकी, खणउछ (रेडलिस्ट)प्रमाणे गंभीरपणे धोक्यात असलेल्या बेअर्स पोचार्ड पक्षी आणि भव्य पण अतिदुर्लभ नेपाळी गरुड (डींशिशि एरसश्रश) येथे आश्रय घेतात. त्यांची उपस्थिती जागतिक पक्षी संवर्धनात अभयारण्याची भूमिका अधोरेखित करते. तसेच, बार हेडेड गीज अर्थात बिर्वा किंवा सवान (इरी - कशरवशव ॠशशीश) नावाचा पक्षीदेखील येथे बघायला मिळतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, नागी ही जागा सिंधु व गंगेच्या मैदानावरील बार-हेडेड गीजच्या सर्वात मोठ्या चमुंपैकी एकासाठी निवासस्थान म्हणून नोंदवली गेली आहे. हे मोहक पाणपक्षी त्यांच्या डोक्यावर असलेल्या विशिष्ट काळ्या पट्ट्यांसह, त्यांच्या वार्षिक स्थलांतराच्यावेळी अभयारण्याची शोभा वाढवतात. विशेष म्हणजे, पुरातन संस्कृत साहित्यामधून आढळणारा, कदंब नावाचा हंसासारखा पक्षी हाच असावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
बार हेडेड गीज हा पक्षी दरवर्षी मध्य आशियातील त्यांच्या प्रजनन स्थळापासून हिवाळ्यात या भारतातील मैदानापर्यंत एक अविश्वसनीय प्रवास करून येतो. हे पक्षी 30 हजार फूट उंचीवर उड्डाण करत बलाढ्य हिमालय ओलांडतात आणि येथे येतात. गीजच्या या प्रवासाने जगभरातील शास्त्रज्ञांना चकित केले आहे. नागी पक्षी अभयारण्यात या गीजच्या वार्षिक स्थलांतरादरम्यानचे सर्वात मोठे एकत्रीकरण बघायला मिळते. त्याच्या पर्यावरणीय मूल्यांच्या पलीकडे नागीचा जलाशय या प्रदेशासाठी सिंचन स्त्रोत म्हणून एक व्यावहारिक उद्देशदेखील पूर्ण करतो. जलाशय 9 हजार, 800 एकर शेतजमिनीला सिंचन प्रदान करतो. तसेच, स्थानिक शेतकर्‍यांना आधार देतो आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करतो. अनेक निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षक नागी येथे दरवर्षी येतात. अभयारण्याची निसर्गरम्य शांतता इळीव इशहर्रींर्ळेीी र्डीींवळशी अर्थात, पक्षी वर्तनाचे निरीक्षण करण्यास पोषक वातावरण देते. येथे, शास्त्रज्ञ आणि पक्षी अभ्यासक पक्ष्यांची छायाचित्रे काढायला आणि वेटलॅण्ड इकोसिस्टिम समजून घ्यायला येतात.



nakti wetalnd
नाक्ती पक्षी अभयारण्य
(रामसर साइट क्रमांक 2546)

नाक्ती धरणाच्या बांधकामातून जन्माला आलेले नाक्ती पक्षी अभयारण्यदेखील सिंचन आणि जैवविविधता संवर्धन या दुहेरी उद्देशाचे काम करते. नाक्ती हे नागीपेक्षा मोठे आणि विस्तीर्ण जैवविविधता केंद्र बनले आहे. सस्तन प्राणी, मासे, पाणवनस्पती, सरपटणारे प्राणी आणि उभयचरांसह 150 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती नाक्ती अभयारण्यात बघायला मिळतात. नाक्तीमध्ये खुल्या पाण्यापासून दलदलीच्या प्रदेशापर्यंतची विविधता बघायला मिळते आणि या सरोवराच्या सभोवतालचे समृद्ध जंगल येथे आढळणार्‍या वैविध्यपूर्ण जीवनाचा आधार बनले आहे.
हिवाळ्यात येथे रेड-क्रेस्टेड पोचार्ड (ठशव उीशीींशव झेलहरीव चिकल्या बदक - मराठीत व लाल सिर किंवा लाल चोंच बतक - हिंदीमध्ये) या पक्ष्यांचा सर्वात मोठा चमू बघायला मिळतो. हे चित्तवेधक बदक त्याच्या आगीसारख्या दिसणार्‍या पिसार्‍यासह जलाशयातील शांत पाण्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय वेधक दिसतात. या सुरेख पक्ष्यांचे प्रणयाराधन नृत्य खरोखरच पाहण्यासारखे असते. प्रजनन हंगामात नर पोचार्ड्स येथे अतिशय विलोभनीय नृत्य प्रदर्शनात व्यस्त बघायला मिळतात. ते वर्तुळाकार पोहतात, तुरा फुलवतात आणि संभाव्य जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी ‘डूपलहीेपळूशव कशरव-लेललळपस’ म्हणजेच डोक्याच्या विशिष्ट हालचाली करतात. हे मनमोहक दृश्य टिपायला अनेक पक्षी अभ्यासक दरवर्षी या सरोवराला भेट देतात. येथील स्थानिक समुदायदेखील नाक्तीच्या संवर्धनात सक्रिय सहभाग घेत आहे. येथे जागरूकता मोहिमा, मार्गदर्शित टूर्स आणि शैक्षणिक कार्यक्रम चालवले जातात, ज्याने पर्यटक आणि इतर स्थानिक लोकांमध्येदेखील जबाबदारीची भावना वाढवण्याचे काम होत आहे. या प्रदेशातील पाणथळ पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न पाण्याची गुणवत्ता राखणे, आक्रमक प्रजाती नियंत्रित करणे आणि खराब झालेले अधिवास पुनर्संचयित करण्यावर केंद्रित आहेत. मानवी हस्तक्षेप इकोसिस्टिमला हानी पोहोचवण्याऐवजी समजून आणि उमजून केला, तर निसर्गाला कसा पोषक होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण नाक्ती अभयारण्य आहे. आजची ही दोन्ही उदाहरणे मानवी हस्तक्षेपाची खरी यशोगाथा आहेत.
आर्थिक आणि सामाजिक पातळीवरदेखील नाक्ती हा या क्षेत्राच्या कृषी समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा जलाशय आहे. नाक्तीचे पाणी क्षेत्रातील अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थानिकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यातही हे अभयारण्य महत्त्वाचे ठरत आहे. तरुण विद्यार्थ्यांना वेटलॅण्ड इकोलॉजीच्या क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी या प्रदेशातील शाळा जलाशयावर फिल्ड ट्रिप आयोजित करत आहेत. अशाप्रकारे, अनेकांसाठी नाक्ती हा एक निसर्गाच्या सान्निध्यातील खुला वर्ग बनला आहे.
भारतासाठी अभिमानाचा क्षण

नवीन रामसर स्थळांच्या या वृत्ताचे पर्यावरणप्रेमींसह पक्षी तज्ज्ञांनीही स्वागत केले आहे. बिहारचे मुख्य वन्यजीव वॉर्डन पी. के. गुप्ता यांनी या दोन पाणथळ जागा रामसर साइट म्हणून ओळखल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यामुळे इतर पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना नक्कीच प्रेरणा मिळेल, अशी टिप्पणी त्यांनी केली. बिहारचे पक्षी तज्ज्ञ अरविंद मिश्रा, जे मुंबईस्थित ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (इछकड)च्या गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य आहेत, त्यांनीदेखील या घोषणेवर आनंद व्यक्त केला आणि बिहार वन, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे आभार मानले. 1984 मध्ये या पाणथळ प्रदेशांना पक्षी अभयारण्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हळूहळू हिवाळ्याच्या महिन्यांत तब्बल 20 हजारांपेक्षा अधिक पक्षी येथे येऊ लागले आणि अनेक स्थलांतर करण्यार्‍या प्रजातींनी ही स्थाने हिवाळ्यातील निवासस्थान म्हणून आता निवडली आहेत. ‘एशियाटिक वॉटरबर्ड सेन्सेस’ (अथउ) 2023 नुसार, नक्ती पक्षी अभयारण्यात सर्वाधिक 7 हजार, 844 पक्षी नोंदवले गेले आहेत, तर नागी पक्षी अभयारण्य 6 हजार, 938 पक्षी नोंदवले गेले आहे. 

मानव आणि निसर्गाची अनपेक्षित सुसंगत सांगड

नागी आणि नाक्ती पक्षी अभयारण्यांना रामसर स्थळे म्हणून नुकताच मिळालेला मान, आणखी एक आकर्षक विरोधाभास आपल्यासमोर मांडतो. केवळ अभियांत्रिकी उद्देशाने बनवलेले हे जलाशय आता एक उत्कृष्ट अधिवासाचे ठिकाण बनले आहे. नागी आणि नक्ती हे जलाशय सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले गेले होते. त्याच्या काँक्रिटच्या भिंती आणि नियंत्रित पाण्याची पातळी, ही जाणीवपूर्वक घडवलेली मानवी कृती होती, ज्यामुळे कमी पाण्याच्या पातळीने तेथे पाणथळ प्रदेश जलाशयाच्या परीघावर तयार होऊ लागला. पण निसर्गाच्या मनात काही वेगळेच होते. निसर्गाने या जलाशयाचा परीघ जैवविविधतेने नटवला. निसर्गाने नेहमीच आपल्या स्थितिस्थापकत्वाची (ठशीळश्रळशपलश) आणि संयोगक्षमतेची (अवरिींरलळश्रळीूं) उदाहरणे दिली आहेत. कारण, त्याने या मानवनिर्मित संरचनांचा स्वीकार केला आणि मिळालेल्या संधीचे सोने केले. बघता बघता अभयारण्याचे लुप्तप्राय प्रजातींसाठी आश्रयस्थान, स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी क्षणभर आसरा आणि प्रजनन स्थलांमध्ये रुपांतर झाले. बार-’हेडेड गीज’ आता हिमालय पार केल्यावर मूलतः आर्द्र असलेल्या या प्रदेशांकडे वाळून अज्ञात अंतःप्रेरणेने प्रवास करून येथे अभयारण्यात पोहोचतात. काँक्रिटच्या भिंती आणि धरणांच्या दरवाज्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून येथे रेड-क्रेस्टेड पोचार्ड नृत्य करताना दिसतात. नागी आणि नाक्ती जणू निसर्ग आणि मानवामधील एक मूक-करार दर्शवतो. आपण फक्त कॅनव्हास प्रदान करतो आणि निसर्ग त्यात रंग भरतो. त्याच्या कल्पनेने आपले जलाशय फक्त साठवण करणार्‍या टाक्या न राहता, परिसंस्था बनल्या आहेत. नागी आणि नक्ती आपल्याला जणू शिकवतात की, सुसंवाद हा निसर्गाबरोबरच्या सह-अस्तित्त्वातच आहे.
- डॉ. मयूरेश जोशी