घटप्रभेच्या तीरावरती

    28-Apr-2025
Total Views | 14
 
plants found in the dry leafy areas of the Ghatprabha valley
 
शुष्क पानगळी परिसरात आढळणार्‍या वनस्पतींच्या विविधतेविषयी आपण नेहमीच अनभिज्ञ असतो. घटप्रभेच्या खोर्‍यातील शुष्क पानगळी परिसरात आढळणार्‍या वनस्पतींचा घेतलेला हा आढावा...
 
सह्याद्री या महाकाय पर्वताने त्याच्या आजूबाजूच्या धरित्रीला एकाचवेळी शाप आणि वरदान देऊन ठेवले आहे. एक प्रदेश हा सुजलाम् सुफलाम् राहील आणि दुसरा दुष्काळी, कोरडवाहू. या कोरड्या देशालाच आपण पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतो. पण तोच कधीकधी धृव व्हावा, तशी या पर्जन्यछायेच्या प्रदेशांची गंमत असते. तिथेसुद्धा जगावेगळी परिसंस्था तयार झालेली असते. वैशिष्ट्यपूर्ण झाडे आणि प्राणी पक्ष्यांना हा प्रदेश अंगाखांद्यावर खेळवत असतो. जो यातून फिरतो, त्याला सदाहरित परिसंस्था या संघर्षातून आलेल्या पर्जन्यछायेच्या यशापुढे कमी वाटू लागतात. तिथले रणरणते ऊन हे शीतल चांदणे बनते आणि पानगळीचा काश्मिरी गालिचा वाटू लागतो.
 
कर्नाटकातला घटप्रभेच्या कुशीतला एक परिसर जिथे आम्ही फिरत होतो, तिथे रणरणते ऊन आणि दूरदूर फक्त पठार होते. 30-35 किमीवर हिडकल नावाचे धरण. मध्येच काही टेकड्या परत सपाट भाग. शुष्क पानगळी परिसरात फिरताना तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसते, ती म्हणजे झाडे, प्राणी, पक्षी, किटक हे एकमेकांना धरून सांभाळून वाढत असतात. आश्रय देत असतात. मदत घेत असतात. मदत करत असतात. इथे कोरड्या वातावरणात निसर्गातील या प्रतिनिधींचे भावनिक व्यवहार चाललेले असतात. घटप्रभेचे खोरे असले, तरी ते आजही कृष्णेचेच समजले जाते. घटप्रभा ही कृष्णेची उपनदी. गाडीतून प्रवास करताना गरम झळा बसत होत्या. तितक्यात एका सुकलेल्या मोठ्या ओढ्याच्या बाजूला डीींशलर्श्रीी रीशिी म्हणजे खरोटी किंवा बेकराची उंच झाडे सापडली. याचे लाकूड सहज जळत नाही. एकदम चिवट.
 
दमट वातावरणात टिकून राहणारे म्हणून तिबेटी-चायनिज बौद्ध समुदायात अधिक वापरात असलेले. 13व्या शतकात दात घासायला याची काडी वापरायचे. नेहमीप्रमाणे रस्त्याची कामे चाललेली. तिथे बाजूला अर्ध्या उखडलेल्या हुंब वृक्षावर समुद्रशोकवर्गातला बोंडवेल दिसला. 
 
घटप्रभेचा हा भाग विरळ असला, तरी वृक्ष समृद्ध आहे. काळ्या कुड्याची उंच झाडे इथे सुखेनैव नांदतात, तर मध्येच तुम्हाला सफेद कुडादेखील डोकावून दर्शन देत राहतो. बदकवेलीतल्या ईळीीेंश्रेलहळर ळपवळलरची सुकलेली फळे लगडलेली दिसतात. हे कॉमन रोझ, क्रिमसन रोझ, सह्याद्री बर्डविंग यांसारख्या फुलपाखरांचे यजमान झाड. आता इथे तुम्हाला छरीळपसळ  हा संत्री कुळातला प्रकार बघायला मिळतो.
 
कवठाच्या पानासारखी पाने या झाडाला असतात. यालाच कन्नड भाषेत ’पत्री’चे झाड म्हणतात. इथे डिकेमाली म्हणजे अनंताच्या वर्गातल्या एका वेगळ्या प्रजातीची नोंद आहे. घोगर म्हणजे सोबत डिकेमाली इथे बर्‍याच प्रमाणात दिसतो. इथला कर्नाटक वनविभाग जंगल चांगले जपतो. त्यांचे सरकारपण त्यांना पाहिजे ती मदत पुरवते. सततच्या गस्ती असतात. एखादी नवीन गोष्ट सांगितली, तर अधिकारी ऐकून घेऊन लगेच समजून घेतात. तिथल्या वनविभागांची बियांची प्रदर्शने असतात. खालचा अधिकारी काही नवीन करत असेल, तर वरिष्ठ दखल घेतात. यामुळेच कर्नाटकामधील जंगले पाहताना तिथल्या जंगलावर प्रेम करणारे ‘फॉरेस्ट रेंजर्स’ बघायला मिळतात.
 
डिकेमालीच्या झाडांमध्ये मेढशिंगीची एक वेगळी प्रजाती मिळते. कन्नडमध्ये या झाडाला चिथोडी किंवा मुरकी म्हणतात. शास्त्रीय नाव आहे. आपल्याकडे आढळते ती मेढशिंगी. या दिवसांत चिथोडीच्या शेंगा वाळून वक्राकार झालेल्या दिसतात. याचे संवर्धन होणे खूपच गरजेचे आहे. कारण खूप थोडी झाडे शिल्लक राहिलेली दिसतात. घटप्रभेचा किनारा आणि पात्र, वरून काळेकभिन्न दिसणारे मात्र फोडले की, आतून रांगोळीसारखी वाळू पडणार्‍या दगडांनी भरलेले आहेत. लिंबू एवढ्या गोट्यापासून ते हत्तीएवढ्या अवाढव्य शिळा. मात्र फोडल्या की पिवळट वाळू पडते इतक्या हलक्या. इथल्या किनार्‍यावर जश्ररु ळालीळलरींर चंदन कुळातल्या महावेली सापडल्या. मराठीत याला कुकुर्बीट असे गमतीशीर नाव आहे. काळ्या तसेच सफेद कुड्यासोबत दुर्मीळ झालेला तांबडा कुडा म्हणजे थीळसहींशर रीलेीशर इथे आहे. याचेही संवर्धन करता येईल, इतका तो दुर्मीळ झाला आहे.
 
 म्हणजे गुग्गुळचे छाटलेले एकमेव खुरटे झुडूप दिसले. शेजारी कारबोरची झुडपे वाढत होती. इथेच एका झाडावर एकदम दुर्मीळ झालेली निळी गुंज सापडली. महाराष्ट्रात फक्त भीमाशंकरला दिसलेली निळी गुंज इथे दिसल्यावर झालेला आनंद अवर्णनीय होता. जरी गुंज म्हणत असलो, तरी आपल्या गुंजेचा आणि यात बराच फरक आहे.
 
निळ्या गुंजेची पाने ही घेवडा किंवा मुगाच्या पानांसारखी दिसतात. लाल गुंजेची पाने ही चिंचेच्या पानांसारखी संयुक्त दिसतात. दोन्ही एकाच वर्गातली झाडे आहेत. टेकडीच्या उतारावर भुत्या  दहिपळस  आणि चारोळ्या झाडाचे तुरळक अस्तित्व दिसले. हेदू नावाचा कदंब वर्गातला वृक्ष अखंड परिसरात एकमेव दिसून आला. याचेही संवर्धन तेथील भागांत करून पुनर्लागवड करणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्याला काही चंदन कुळातले दूाशपळर राशीळलरपरची झुडपे दिसतात. याची फुले खूपच सुंदर आणि मंद सुवास असलेली असतात. मधमाशांचे हे अत्यंत आवडते झाड. मराठीत या झाडाला नागरी म्हटले जाते.
 
याव्यतिरिक्त पाडळ, अंजनी, टालबोटी वड, बेहडा, पिलखण, मैसूर वड, फणसाची झाडे इथे दिसतात. घटप्रभेचे खोरे पादाक्रांत करून कोल्हापूरसाठी परत निघणार त्याआधी ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध अजान वृक्षांची मांदियाळी दिसली ओळीने फुललेली झाडे पाहून दिसलेल्या सर्वच झाडांची जंत्री ’अनवरत भूमंडळी’ झालेली दिसली, तर ’भेटतु या भूता’ समाधान झाले. आमचे एक मित्र म्हणतात, ‘शुष्क पानझडी वनांमध्ये तेथील प्रदेशनिष्ठ झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, तर सदाहरित वनांमध्ये जी झाडे आहेत, तेच जंगल जपले पाहिजे. तिथे वेगळे काही करणे गरजेचे नाही. आपण नेमके उलट करतो. जिथे भरपूर पाऊस, तिथेच वनीकरण करत असतो. दुष्काळी जंगल परिसंस्था या खरच संघर्षातून आलेल्या यशाचे प्रतीक आहेत. त्या प्रतिकूलतेत जगायला शिकवतात. कदाचित याचसाठी सह्यगिरीने त्यांना जन्म दिला असावा.
 
- रोेहन पाटील  
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121