शिवराजसिंह चौहान देशाचे नवे कृषीमंत्री!

आरोग्य मंत्रीपदी जे पी नड्डा तर मुरलीधर मोहोळ सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री

    10-Jun-2024
Total Views |
agricultral minister Shivrajsingh Chauhan
 


नवी दिल्ली :      मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहिर झाले असून केंद्रीय गृह व सहकारमंत्री म्हणून अमित शाह, संरक्षण मंत्रीपदी राजनाथ सिंह, अर्थमंत्रीपदी निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्रीपदी डॉ. सुब्रमण्यम जयशंकर हेच कायम राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारमधील मंत्रीपरिषदेचे खातेवाटप जाहिर झाले आहे.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अनेक मंत्र्यांच्या खात्यांची पुनरावृत्ती झाली आहे. तर काहींची मंत्रिपदे बदलण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग त्यांच्याकडे ठेवला आहे. यासोबतच सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि असे सर्व विभाग जे कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत, पंतप्रधानांकडेच राहतील.

रायसिना हिलवरील चार महत्त्वाचे खाते आणि त्यांचे मंत्री कायम आहेत. गृह व सहकार खाते अमित शाह यांच्याकडेच अपेक्षेप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अर्थखाते निर्मला सीतारामन, संरक्षण खाते राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री म्हणून डॉ. एस. जयशंकर हेच कायम आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव काम पाहतील.

वाणिज्य व उद्योग खाते पियुष गोयल यांना देण्यात आले आहे. कृषी व ग्रामविकास मंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान तर आरोग्य व रसायने व खतेमंत्रीपद जगतप्रकाश नड्डा यांना देण्यात आले आहे. गृहनिर्माण व ऊर्जा खाते मनोहरलाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शिक्षणमंत्रीपदी धर्मेंद्र प्रधान आणि पर्यावरण मंत्रीपदी भुपेंद्र यादव कायम आहेत.
 

हे आहेत कॅबिनेट मंत्री

1. राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय

2. अमित शहा- गृह मंत्रालय, सहकार मंत्रालय

3. नितीन जयराम गडकरी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

4. जगत प्रकाश नड्डा- आरोग्य मंत्रालय, रासायनिक खत मंत्रालय

5. शिवराज सिंह चौहान- कृषी आणि कुटुंब कल्याण, ग्रामीण विकास मंत्रालय
 
6. निर्मला सीतारामन- अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
 
7. एस जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय

8. मनोहर लाल खट्टर- ऊर्जा, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार

9. एचडी कुमारस्वामी - अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय मंत्री

10. पियुष गोयल- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

11. धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री

12. जीतन राम मांझी- एमएसएमई मंत्रालय

13. राजीव रंजन सिंग (लल्लन सिंग)- पंचायत राज, मासे, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय

14. सर्बानंद सोनोवाल - बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग

15. वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

16.राममोहन नायडू- नागरी विमान वाहतूक

17. प्रल्हाद जोशी - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण; आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा

18.जुअल ओराव - आदिवासी व्यवहार

19. गिरीराज सिंह- वस्त्रोद्योग मंत्रालय

20.अश्विन वैष्णव - रेल्वे; माहिती आणि प्रसारण; आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

21.ज्योतिरादित्य सिंधिया -संवाद; आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास
 
22.भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल

23.गजेंद्रसिंह शेखावत- संस्कृती; आणि पर्यटन

24.अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास

25.किरेन रिजिजू – संसदीय कामकाज; आणि अल्पसंख्याक

26.हरदीप सिंग पुरी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

27.मनसुख मांडविया- कामगार आणि रोजगार; आणि युवा घडामोडी आणि क्रीडा
 
28. जी किशन रेड्डी - कोळसा; आणि खाणकाम

29.चिराग पासवान- अन्न प्रक्रिया उद्योग

30.सी. आर. पाटील- जलशक्तीहे आहेत महाराष्ट्राचे मंत्री

 
१. नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

२. पियुष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री

३. प्रतापराव जाधव – (राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार) – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री
 
४. रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री

५. रक्षा खडसे – युवक कल्याण आणि क्रिडा राज्यमंत्री

६. मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री