शेअर बाजार विश्लेषण: बाजारात 'कंसोलिडेशन ' वादळापूर्वीची ' तटस्थ ' शांतता सेन्सेक्स घसरला निफ्टी सपाट

बँक निर्देशांकात घसरण कायम

    08-May-2024
Total Views |


Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बाजारातील चढउतार आज कायम राहत अस्पष्ट संकेत बाजारात मिळाले आहे. सेन्सेक्स निर्देशांकात अखेरच्या सत्रात ४५.४६ अंशाने घसरण होत ७३४६६.३९ पातळीवर बाजार पोहोचले आहे तर निफ्टी ५० निर्देशांकात पातळी सपाट राहिली असून 'इक्विलीब्रीयम' स्थितीत बाजार पोहोचले आहे. निफ्टी ५० निर्देशांकात ० टक्क्यांनी बदल झाला आहे.
 
कालपर्यंत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली होती. आज बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७८ व ०.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.८३ व ०.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे बँक निर्देशांकात गेले ४ दिवसांपासून सुरू असलेली घसरण कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक २१०.१३ अंशाने घसरत ५४७१९.१५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २६४.२५ अंशाने घसरत ४८०२.१० पातळीवर पोहोचला आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात Sectoral Indices)संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. निफ्टी बँक (०.५५ %) फायनाशियल सर्विसेस (०.५३%) , प्रायव्हेट बँक (०.८१%) कनज्यूमर ड्युरेबल्स समभागात नुकसान झाले असून ऑटो (१.५६%) एफएमसीजी (०.४४%), मिडिया (०.८८%), मेटल (१.४८%) तेल गॅस (१.७०%) समभागात वाढ झाली आहे.
 
बीएसईत (BSE) आज एकूण ३९२६ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २१२८ समभाग (Shares) वधारले असून १६६७ समभागात घसरण झाली आहे. त्यातील १५४ समभागात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ३१ समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरले आहे. एकूण ६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत (NSE) मध्ये आज एकूण २७०६ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १५०९ समभाग वधारले असून १०८२ समभागात नुकसान झाले आहे. त्यातील ७२ समभाग ५२ आठवड्यात सर्वाधिक मुल्यांकनात राहिले आहेत तर २५ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण १०६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ६६ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले होते.
 
आज बीएसईत मुख्यतः वाढलेल्या मुख्य समभागात ८ ते १३ टक्क्यांनी वाढ झाली होती तर घसरलेल्या समभागात ५ ते १५ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे. यावरून हे स्पष्ट होते की बाजारातील चढउतार मोठ्या प्रमाणात कायम राहिली आहे.आजही निफ्टीतील VIX Volatility Index हा १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. कालपेक्षा आजही या निर्देशांकात ०.४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
आज बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४००.६८ लाख कोटी होते तर एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ३९७.३६ लाख कोटी रुपये राहिले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ८३.४० प्रति डॉलरवर स्थिरावली आहे. आज बाजारात कालप्रमाणे रुपयांच्या तुलनेत डॉलरमध्ये कुठलाही बदल झालेला नाही.सकाळी ४ पैशाने रुपया वधारला होता जो ८३.४८ रुपयांवर पोहोचला होता आता संध्याकाळपर्यंत रुपयाचा दर ८३.४८ वरच कायम राहिला आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्यात भाववाढ झाली होती परंतु संध्याकाळपर्यंत युएस फ्युचर गोल्ड निर्देशांकात ०.०३ टक्क्यांनी घसरण झाली असल्याने बाजारातील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.भारतातील सोन्याच्या दरात ' गुड रिटर्न्स' संकेत ळावरील माहितीनुसार प्रति १० ग्रॅम दरात ११० रुपयावर घसरण झाली आहे.भारतातील एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.०५ टक्क्यांनी वाढ होत सोने ७११८५.०० पातळीवर पोहोचले होते. चांदीच्या निर्देशांकात ०.१२ टक्क्यांनी घट होत चांदी दर १ किलोमागे ८२७८० रुपयांवर पोहोचला आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कालपर्यंत महागलेले क्रूड (कच्चे तेल) बाजारात सकाळपर्यंत स्वस्त झाले होते. अमेरिकेतील आकडेवारीनुसार क्रूड तेलाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याचे वृत्त आल्यानंतर चढलेला क्रूडचा भाव घसरला होता.क्रूड तेलाचे निर्देशांक सकाळी १.३५ टक्क्यांहून अधिक पातळीवर घसरले होते. संध्याकाळपर्यंत क्रूड तेलाच्या WTI Future क्रूड निर्देशांकात ०.९३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. Brent क्रूड निर्देशांकात ०.८४ टक्क्यांनी घसरण झालेली आहे. भारतातील एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange)क्रूड तेलाच्या निर्देशांकात तब्बल १.४३ टक्क्यांनी घसरण होत तेलाची प्रति बॅरेल किंमत ६४९१.०० पातळीवर किंमत पोहोचली आहे.
 
कालपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बीएसईतील संस्थात्मक परदेशी गुंतवणूकदारांनी ३६६८.८४ कोटींची निव्वळ गुंतवणूक काढून घेतली होती.एनएसईत ३६६८.८४ कोटींची गुंतवणूक संस्थात्मक परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली होती. आज मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली असली तरी मोठ्या ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात मोठा चढ उतार झाल्याने बाजार 'तटस्थ' स्थितीत पोहोचले आहे.
 
युएस मध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याची शक्यता धूसर असताना भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांची त्या मुद्द्याला हात न घालता अधिक लक्ष क्षेत्रीय निर्देशांकात गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे त्यामुळे मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक वाढल्याने अनेकांनी नफा बूकिंग केल्याची शक्यता आहे दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार अस्थिर झाल्याने मोठ्या गुंतवणूकीची 'रिस्क' गुंतवणूकदारांनी घेतली नसल्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने बाजारातील तरलता वाढवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात चलन तुटवडा जाणवणार नसला तरी बाजारात आगामी काळात परदेशी गुंतवणूकदार काय भूमिका बजावताते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे प्रमाण घटल्याने बाजारात चिंतेचे वातावरण होते. मात्र सध्याच्या 'कंसोलिडेशनच्या ' स्थितीत प्राईज करेक्शन होत भारतीय गुंतवणूकदार आगामी काळात गुंतवणूकीत वाढ करू शकतो. काही कंपन्याचे तिमाही निकाल आकर्षित न आल्याने बाजारात रॅली झाली नाही.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात DoW Jones, S & P 500 या बाजारात वाढ झाली असून NASDAQ मध्ये घसरण झाली आहे. युरोपातील बाजारात FTSE 100, DAX, CAC या तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातील NIKKEI, HANG SENG, SHANGHAI तिन्ही बाजारात आज घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'शुक्रवारपासून सुरू झालेली करेक्शन आजही सुरू आहे. आज वाढलेले शेअर्स थोडे जास्त आहेत. पण हा आठवडा असाच राहील वास्तविक बाजार अजुनही खाली यायला हरकत नाहीये. जवळपास ५०० अंक निफ्टी खाली आला आहे. मान्सून अपेक्षेपेक्षा जास्त असणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात पैसा जास्त खेळेल या अपेक्षेने एफएमसीजीतील दिग्गज हिंदुस्थान लिवर व इतर कंपन्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे निर्देशांक सावरायला मदतच झाली. पण आज एचडीएफसी बॅक बजाज ग्रुप,फायनान्स कंपन्यांमुळे निर्देशांक खाली आला. कंसोलीडेशनची ही फेज बाजारासाठी खूप आवश्‍यक आहे. कच्चे तेल हे हळुहळु ७५$ च्या आत येईल असे दिसत आहे.आज १ ते १.५० ने कमी झालेलं आहे. पण बाजार असाच हा आठवडा तरी नरमच राहावा असं अपेक्षित आहे.
 
आपले लोकल म्युचल फंडात एक आठवड्यात १२ ते १४ हजार कोटी फंड जमतो आहे. हे बहुतेक फंड बाजारात च गुंतवणूक केले जातात. त्यामुळे मंदी अशी बाजारात हल्ली फारशी पहायला मिळत नाही पण काही दिवस किंवा एक दोन आठवडे बाजार शांत रहायला हवा.तरच मोठी तेजी जून नंतर पाहु शकू असे वाटते.१४ तारखेपासून बाजार सुधारण्यास सुरवात दिसेल.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,'भारतीय बाजारपेठेने आपल्या आशियाई समवयस्कांप्रमाणेच गुंतवणुकदारांच्या भावना कमी केल्या, आणि घटत्या मतदानाच्या चिंतेमुळे ही शक्यता आहे.देशांतर्गत चौथ्या तिमाहीतील कमाई मोठ्या प्रमाणावर अंदाजे पूर्ण करत असतानाही, कमाईचे परिदृश्य मध्यम असल्याचे दिसून येते. एफएमसीजीमध्ये व ऑटो स्टॉकएक क्षेत्र-विशिष्ट क्रिया दिसून आली आणि H1FY25 मध्ये ग्रामीण मागणीत पुनरुज्जीवन होण्याच्या अपेक्षेने मदत केली.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले की,'आज निफ्टी २२३०२ वर बंद झाला तर सेन्सेक्स ०.०६% घसरून ७३४६६ वर बंद झाला. निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी ऑटो हे अनुक्रमे १.७०% आणि १.५६% ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते.
 
Q4 परिणामांमध्ये, IT उद्योगाने कमाईत आणखी घट होण्याची शक्यता वाढवली आहे. FY25 साठी कमकुवत वाढीचा अंदाज आणि मार्जिन सुधारण्यासाठी कमी जागा यामुळे निफ्टी आयटी नकारात्मक झाला.सबस्क्रिप्शनच्या पहिल्या दिवशी आधार हाउसिंग फायनान्स ०.२६ पटीने सबस्क्राइब झाले. एकूण गुंतवणूकदारांनी 1.86 कोटी इक्विटी शेअर्स ७ कोटी शेअर्सच्या तुलनेत खरेदी केले. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ०.२४ पट सदस्यता घेतली, पात्र संस्थागत खरेदीदारांनी ०.३२ पट सदस्यता घेतली.
 
किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.२४ पट सदस्यता घेतली. हिरो मोटोकॉर्प, बीपीसीएल, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड कॉर्प, हिंदाल्को हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर डॉ रेड्डीज लॅब्स, एशियन पेंट्स, ग्रासिम, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाइफ इन्शुरन्स हे निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट ऋषिकेश येडवे म्हणाले, 'देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक दिवसभर अस्थिर राहिले आणि २२३०२ वर बंद झाले.निवडणुकीच्या निकालाबाबत अनिश्चितता तसेच उच्च अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार बाजूला राहिले. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाला ५०-DEMA जवळ आधार मिळाला आणि एक लहान तेजीची मेणबत्ती तयार झाली. तथापि, निर्देशांक ३४-DEMA (२२३४४) आणि २१-DEMA (२२४०३) च्या अडथळा खाली बंद झाला.
 
जोपर्यंत निर्देशांक २२४०२ च्या खाली राहील तोपर्यंत अल्पकालीन कमजोरी कायम राहील. जर निर्देशांक २२४०२ च्या वर राहू शकला तर, २२५००-२२६०० पर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नकारात्मक बाजूने, निर्देशांकाला २२१००-२२००० स्तरांवर मजबूत समर्थन मिळेल.एकंदरीत, नजीकच्या भविष्यात निर्देशांक २२०००-२२८००श्रेणीत एकत्र येण्याची आम्हाला अपेक्षा आहे.'
 
आजच्या रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,' रुपया ८३.५१ च्या आसपास घसरला, ०.०१ रुपये चा किरकोळ तोटा अनुभवला. डॉलर निर्देशांक सपाट राहिला आणि भांडवली बाजाराने एका मर्यादेत व्यापार सुरू ठेवला, जो रुपयासाठी तटस्थतेचे संकेत देत आहे. बाजारातील सहभागी सार्वत्रिक निवडणुकांमुळे कोणत्याही रॅलीच्या अपेक्षेची वाट पाहत आहेत,जरी RBI च्या हस्तक्षेपांमध्ये अशा ट्रेंड सध्या कमी होत आहेत जे रुपयाला ८३.२५-८३.७५ च्या कडेकडेच्या श्रेणीत ठेवत आहेत."
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड एसव्हीपी टेक्निकल रिसर्च अजित मिश्रा म्हणाले,' बाजारातील अस्थिरता कायम राहिली, शेवटी किरकोळ बदल झाल्यामुळे ते अलीकडील घसरणीनंतर थांबले.यावेळी व्यापारी विविध क्षेत्रांमध्ये मिश्र लँडस्केप नेव्हिगेट करण्यात गुंतले होते, ऑटो, ऊर्जा आणि धातू मध्यम नफा दाखवत होते. व्यापक निर्देशांकांनीही दिलासा अनुभवला, प्रत्येकी अर्ध्या टक्क्यांनी वाढली.
 
निफ्टी आणि जागतिक बाजारपेठेत २२१५० अंकाच्या आसपास घिरट्या घालत असलेल्या समर्थनामुळे, काही प्रमाणात एकत्रीकरण होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा निफ्टी खात्रीपूर्वक २२५०० थ्रेशोल्ड ओलांडत नाही तोपर्यंत प्रचलित भावना निराशावादी राहण्याची शक्यता आहे.व्यापाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा आणि हेज्ड पोझिशन राखण्याचा सल्ला दिला जातो.'