कोल्हापूरात हिंदू मंदिराभोवती वक्फ बोर्डाचे अतिक्रमण; ग्रामस्थ आक्रमक!
28-May-2024
Total Views | 1424
मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या (Kolhapur News) वडणगे गावातील ग्राम दैवत शंभु महादेवाची जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे वडणगे बंदची हाक पुकारण्यात आली होती. ग्रामस्थांनीसुद्धा पूर्णतः बंद पाळला होता. यावेळी बंदमध्ये विविध हिंदू संघटना आणि स्थानिक रहिवाशांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यातून गावाच्या एकजुटीच्या भूमिकेचे स्पष्ट प्रदर्शन निदर्शनास आले.
जमिनीसंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ग्रामपंचायत आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ‘कृषी सर्व्हे क्रमांक ८९’ ही वडणगे गावातील जमीन ग्रामपंचायतीची आहे. वक्फ बोर्डाने २५ वर्षांपूर्वी या जमिनीवर दावा केला होता आणि तेव्हापासून सुनावणी सुरू आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन आपली बाजू प्रभावीपणे मांडू न शकल्याने ही जमीन वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली. याच गोष्टीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बंद पाळला.