आरोपी मुलीच्या जामीनासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी केली डील; अहवालातून बाब उघड!

    28-May-2024
Total Views | 127
k kavitha kcr deal report


नवी दिल्ली :     दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात के कविता यांना अटक करण्यात आली होती. यासंदर्भात आता एका अहवालातून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. दरम्यान, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना भाजपवर तडजोडीसाठी दबाव आणण्यासाठी मोईनाबाद फार्महाऊस आमदार सौदेबाजी प्रकरणाचा वापर करायचा होता, असा धक्कादायक खुलासा फोन टॅपिंग प्रकरणातील डीसीपी (टास्क फोर्स) आरोपीच्या कबुलीजबाबाच्या अहवालातून करण्यात आला आहे.

दरम्यान, स्पशेल इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख टी प्रभाकर राव यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये पायलट रोहित रेड्डी यांना सांगितले होते की, बीआरएस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रभावशाली असल्याचा दावा करणारे काही लोक त्यांना लक्ष्य करत होते. त्यांच्यावर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच, मुलगी के. कविता यांना दिल्ली मद्य घोटाळ्याच्या प्रकरणातून मुक्त करण्यासाठी या प्रकरणाचा वापर करू इच्छित होते, असे अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे केसीआर यांना के कविता यांच्या जामिन प्रकरणात डील करण्यासाठी आमदार बार्गेनिंग प्रकरणात दबाव आणू इच्छित होते. सदर अहवालात असेही म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांनी आमदारांना डावलण्याच्या कटाची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर भाजप नेते बीएल संतोष यांना अटक करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

मात्र, तेलंगणा उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवल्याने केसीआरचे इरादे उधळले गेले आहेत. टास्क प्रमुख राव यांनी आपल्या कबुलीजबाबात सांगितले आहे की, त्यांची योजना अयशस्वी झाल्यानंतर केसीआर खूप संतापले होते. त्यांनी म्हटले आहे की, यापेक्षा जास्त ते सांगू शकत नाहीत कारण केसीआर त्यांच्यावर अनेक उपकार आहेत, अशी माहिती अहवालातून उघडकीस आली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121