एएसआयला सापडले महाभारत आणि मौर्य काळातील अवशेष

    16-May-2024
Total Views |
   
ASI Rajasthan

मुंबई (प्रतिनिधी) :
राजस्थानाच्या दौसा जिल्ह्यातील वेझा गावात (Vejha Village ASI) महाभारत आणि मौर्य काळातील अवशेष सापडले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने उत्खननादरम्यान गावातील एका ढिगाऱ्यावर २५०० वर्षांहून जुन्या कलाकृतींचा शोध लावला आहे. यात पितळेची हत्यारे, नाणी आणि मौर्य काळातील पुतळ्याचे शीर, शुंग काळातील अश्विनी कुमारांची शिल्पे आणि हाडांची अवजारे यांचा समावेश आहे. दरम्यान महाभारत काळातील मातीच्या भांड्यांचे तुकडे व इतर कलाकृती देखील सापडल्या आहेत.

हे वाचलंत का? : ३० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; काहींवर होते ३९ लाखांचे बक्षीस

उत्खननामध्ये प्रत्येकी अंदाजे ३० फूट खोल असलेल्या दोन विहिरी खोदल्या असून यात प्राचीन विटांच्या भिंती आणि काही मातीची भांडी सापडली आहेत. जानेवारी महिन्यापासून उत्खनन सुरू करण्यात आले होते. या उत्खननादरम्यान लागलेले शोध अत्यंत उल्लेखनीय व काहीसे वेगळे आहेत.