शेअर बाजार विश्लेषण: बाजारात आज कंसोलिडेशन होत किरकोळ घसरण ! नफा गुंतवणूकीसाठी हेवीवेट समभाग पाडले सेन्सेक्स ११७.५८ व निफ्टी १७.३० अंकाने घसरण

पीएसयु बँक, रिअल्टी, तेल गॅस समभागात वाढ तर बँक, ऑटो, मिडिया समभागात घसरण

    15-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात थोडी घसरण झाली आहे. बाजारातील चढउताराचे प्रमाण सकाळपासून अधिक प्रमाणात होते. सकाळप्रमाणे बाजारात 'इक्विलीब्रियम' पातळीतील चढउतार होत असताना बाजार अखेरच्या क्षणात बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ११७.५८ अंशाने घसरत ७२९८७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १७.३० अंशाने घसरत २२२००.५५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सकाळच्या सत्रात दोन्ही बँक निर्देशांकातही घसरण झाली होती जी अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ९०.८७ अंशाने घसरण होत निर्देशांक ५४४७२.८६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक १७२.०० अंशाने घसरत ४७६८७.४५ पातळीवर पोहोचला आहे. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५५ टक्क्यांनी व ०.९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९७ व ०.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
सकाळच्या सत्राप्रमाणेच मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने बाजारात घसरणीची मर्यादा रोखण्यात बाजाराला यश आले आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये काही क्षेत्रात घसरण झाली तर काही क्षेत्रीय समभागात वाढ झाली. आज विशेषतः गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय निर्देशांकात वैयक्तिकपणे कल दिला असल्याने यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
 
सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.४२%), रियल्टी (१.०२%), तेल गॅस (०.५९%) कनज्यूमर ड्युरेबल्स (०.४९ %) झाली आहे तर गुंतवणूकदारांना नुकसान एफएमसीजी (०.९१%), ऑटो (०.५०%), बँक (०.३६%), मिडिया (०.५१%) या समभागात झाले आहे. बाजारात वरकरणी निर्देशांकात घट दिसत आली असली तरी आकडे पाहता घसरलेल्या समभागात मोठी घसरण झालेली नाही. त्यामुळे आज एकप्रकारे बाजारात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने मोठी पडझड झाली नाही.
 
बीएसईत एकूण आज ३९३५ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २२०४ समभागात वाढ झाली असून १५८९ समभागात आज घसरण झाली आहे. १७९ समभागाचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक असून ३३ समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे.एकूण ३३१ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १७४ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २६९८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १५७५ समभाग वधारले असून १००४ समभागात आज घसरण झाली आहे तर ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकन १०० समभागाचे राहिले असुन १४ समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे. यातील १७३ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५० समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
सकाळपासूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. संध्याकाळपर्यंत युएस फ्युचर गोल्ड ०.६७ टक्क्यांनी वाढले आहे. भारतातील एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.५१ टक्क्यांनी वाढ झाली असून सोन्याचे दर ७२६६९.०० पातळीवर पोहोचले आहे. तर भारतातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम, ४०० ते ४३० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईतील २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४०० ते ४३० रुपयांनी वाढ झाली असल्याने सोने ७३२५० रूपयांवर पोहोचले आहे.
 
आज संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या (क्रूड) दरात वाढ झाली आहे. कालपर्यंत क्रूड दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण झाली होती. अमेरिकन बाजारातील महागाईचे आकडे आल्यानंतर क्रूड तेलाच्या मागणीत घट झाल्याने ओपेक राष्ट्रांनी तेलाचे दर नियंत्रित केले होते. मात्र संध्याकाळपर्यंत डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यानंतर क्रूड तेलाच्या मागणीत वाढ होईल या अपेक्षेने बाजारात मागणीची शक्यता वाढल्याने पुन्हा क्रूडही महागण्याची शक्यता आहे.WTI Future क्रूड निर्देशांकात ०.१७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.२७ टक्क्यांनी घसरण झाली होती. एमसीएक्सवर क्रूड तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत कोणताही बदल झाला नव्हता. निर्देशाक ०.०० टक्क्यांवर असून प्रति बॅरेल किंमत ६४९८ रुपयांवर पोहोचली आहे.
 
बीएसईत आज एकूण कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४०४.२५ लाख कोटी होते तर एनएसईत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४००.६६ लाख कोटी होते. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत १ पैशाने वधारून ८३.५३ रुपयांवर स्थिरावले आहे.
 
बाजारातील निर्देशांकात आज वरकरणी किंचित घसरण झाली तरी बाजारात 'अंडरकरंट' कायम आहे मुख्यतः बाजारातील हेवीवेट दोन तीन समभाग वगळता इतर समभागात पुरेशी वाढ झाली होती. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्येही वाढ झाल्याने बाजारात वरच्या स्थानावर बाजार पोहोचल्याचे संकेत मिळाले होते मात्र काही लार्ज कॅप निर्देशांकात घसरणीमुळे बाजारात 'कंसोलिडेशन' ची परिस्थिती कायम राहिली होती.आज पुन्हा एकदा भारतीय गुंतवणूकदारांनी 'नफा बुकिंग' कडे आपली नजर वळवत सावधता बाळगल्याने बाजारात वरकरणी झालेली घसरण बाजारात दिसली आहे तरी बाजारातील परिस्थिती बघता येणाराआठवडा 'बूम' आणू शकता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
बाजारात आज अमेरिकन महागाई दराचे आकडेवारी येणार असल्याने त्याचा भारतात किती परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय बाजारातील आज एकूण परिस्थिती पाहता निवडणूकीपूर्वी लार्जकॅप समभगातील विभागणी कुठल्या दिशेने जाईल यावर बाजाराची आठवड्यातील दिशा ठरणार आहे. गेल्या आठवड्यापासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली विक्री सुरू ठेवली असली तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही गुंतवणूक वाढल्याने बाजारात त्याचा खोलवर फटका दिसला नाही.
 
दुसरीकडे युरोपीय बाजारात मोठी रॅली झाल्याने अमेरिकन बाजारातील आव्हान वाढलेले आहे. मध्यंतरी बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय ठेवल्याने अमेरिकन बाजारात प्रेशर तयार झाले होते परंतु तरीही गेल्या आठवड्यात बाजारात वाढ झाली होती. फेडरल व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता असल्यानं अमेरिकन बाजारातील गुंतवणूकदारांनी आपले लक्ष महागाई दरावर केंद्रीत केले होते. मंगळवारी परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण ४०६५ कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ३५२८ कोटींची गुंतवणूक बाजारात केली होती.
 
आज शेअर बाजारात घसरण होण्यात रिलायन्स, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज या 'हेवीवेट' समभागात घट झाल्याने त्याचा परिणाम निर्देशांकात झाला आहे. याशिवाय आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र प्रतिसादाचा फारसा फरक भारतीय बाजारात झाला नसल्याने पुन्हा एकदा बाजारात 'कंसोलिडेशन' कडे मार्गक्रमण करत असल्यास उद्याचा नवा ट्रिगर कोणता हे उद्या बाजारात स्पष्ट होईल.
 
अखेरच्या सत्रात बीएसईत गुंतवणूकदारांना भारती एअरटेल, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, एम अँड एम, एचसीएलटेक, लार्सन, एक्सिस बँक, टाटा स्टील, विप्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा या समभागात वाढ झाली आहे तर टाटा मोटर्स, एशियन पेंटस, एचडीएफसी बँक, जेएसडब्लू स्टील, सनफार्मा, एचयुएल,, नेस्ले, टीसीएस, टायटन कंपनी, बजाज फिनसर्व्ह, मारूती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, आयटीसी, रिलायन्स या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएसईत आज गुंतवणूकदारांना कोल इंडिया, सिप्ला, बीपीसीएल, भारती एअरटेल, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, हिंदाल्को, लार्सन, एचसीएलटेक,अदानी पोर्टस, एक्सिस बँक, विप्रो, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटोकॉर्प, कोटक महिंद्रा, एसबीआय, ओएनजीसी, डॉ रेड्डीज, बजाज फायनान्स या समभागात फायदा झाला आहे तर एशियन पेंटस, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, ब्रिटानिया, जेएसडब्लू स्टील, सनफार्मा, एचयुएल, एनडीएफसी लाईफ, नेस्ले, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी , श्रीराम फायनान्स, मारूती सुझुकी, इन्फोसिस, इंडसइंड बँक, रिलायन्स, अपोलो हॉस्पिटल, ग्रासीम, टेक महिंद्रा या गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' भारतीय बाजार आज अपेक्षित चालीवर प्रमाणे दोन दिवसांत जे कमावल ते थोडेफार विक्री करून कंसोलिडेशनची प्रक्रिये मधे आहे. आंतरराष्ट्रीय सामाजिक भौगोलिक आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आहे. कच्च्या तेलाच्या किंमती खूप कमी जास्त नाहीत. भारतीय बाजार ऑल टाईम हाय २२७०० पासुन २१९०० पर्यंत येऊन परत २२१०० ते २२२०० च्या रेंजमध्ये सेटल होणार का? हे बघणे महत्त्वपूर्ण आहे. आज एचडीएफसी बॅकेंमध्ये मागील दोन दिवसाचा नफा बुक केला गेला आहे. आता १४३० चा दर हा नवीन बेस तयार होतोय का हे पाहणे आहे. कारण आजची पडझड एचडीएफसी व रिलायन्सचे निर्देशांकातील असलेल्या मोठ्या टक्केवारीमुळे दिसत आहे. वास्तविक बाजार आज पुर्णतः फ्लॅट आहे. हीच चाल बाजारात काही दिवस राहील. म्हणजे २-३ दिवस अप एक दिवस डाऊन असे राहील असे दिसतय. बाजाराला विश्वास निवडणूक निकालानंतर येईल.अमेरिकेतील महागाई व फेडच्या बैठकांवर पुढील चाल बाजार ठरवेल.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च हृषिकेश येडवे म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक बुधवारी सकारात्मकपणे उघडले, मजबूत जागतिक संकेतांमुळे. त्यापाठोपाठ, निफ्टी गॅप अपसह उघडला आणि नफा बुकिंगचा साक्षीदार झाला, दिवस २२२०१ वर किरकोळ नकारात्मक नोटवर स्थिरावला.
तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन स्केलवर, निर्देशांकाला २२३०० स्तरांजवळ प्रतिकाराचा सामना करावा लागला आहे, जेथे २१-दिवसांची घातांकीय हलती सरासरी (२१-DEMA) ठेवली जाते. जोपर्यंत निर्देशांक २२३०० पातळीच्या खाली राहील, तोपर्यंत निर्देशांक २२०००-२२३०० च्या श्रेणीत एकत्र येण्याची आम्हाला अपेक्षा आहे. जर निर्देशांक २२३१० च्या वर टिकून राहिला तर पुलबॅक रॅली २२५०० पातळीपर्यंत वाढू शकते.
 
बँक निफ्टी सकारात्मक नोटेवर उघडला परंतु उच्च पातळीवर टिकू शकला नाही, परिणामी नफा बुकींग झाला आणि दिवसाचा दिवस नकारात्मक नोटेवर ४७६८७ वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक अजूनही तेजीच्या गुंतलेल्या मेणबत्त्याचा आदर करत आहे, जे सामर्थ्य दर्शवते.जोपर्यंत निर्देशांक ४६,९८३ च्या वर राहील तोपर्यंत तेजीचा वेग कायम राहील. वरच्या बाजूस, २१-DEMA ४८०६० जवळ ठेवला आहे, जो निर्देशांकासाठी पहिला अडथळा म्हणून काम करेल, त्यानंतर ४८५००'
 
बाजारातील परिस्थितीविषयी भाष्य करताना, बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आज निफ्टी २२२०० वर सपाट नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स ०.१६% नी ७२९८७ वर बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी एनर्जी अनुक्रमे १.४२ % आणि १.१५% ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते. पीएफसी व्यवस्थापनाच्या मते, ते आरबीआयच्या मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे मूल्यांकन करत आहेत आणि नफ्यावर कोणत्याही नकारात्मक परिणामाची अपेक्षा करत नाहीत. जरी ते सुमारे ३५% वर पुरेसे भांडवल पर्याप्ततेची हमी देतात.
 
आरबीआयच्या मसुद्यात, मोठ्या तरतुदी- बांधकामादरम्यान 5%, ऑपरेशननंतर २.५ % आणि पुरेशा रोख प्रवाहासह १% चालू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सुचवल्या आहेत. अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल: FY25 मध्ये २%, FY26 मध्ये ३.५% आणि FY27 पर्यंत ५ %. कर्जदार सध्या थकीत नसलेल्या किंवा तणावाखाली असलेल्या प्रकल्प कर्जांसाठी ०.४% बाजूला ठेवतात.
 
पीबी फिनटेक, थरमॅक्स, सुंदरम फायनान्स आणि कॅनरा बँक यांनी आज एमएससीआयच्या ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये हे स्टॉक जोडल्याने वाढ झाली, ज्यामुळे या समभागांबाबत गुंतवणूकदारांमध्ये आशावाद निर्माण झाला तर, एमएससीआय ग्लोबलमधून स्टॉक बाहेर फेकल्यानंतर One97 कम्युनिकेशन्सच्या व्यापारात घसरण झाली. मानक निर्देशांक. कोल इंडिया, सिप्ला, बीपीसीएल,भारती एअरटेल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, आयशर मोटर्स आणि एचडीएफसी बँक सर्वाधिक तोट्यात होते.
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'तीन दिवसांच्या तेजीनंतर, बाजारांनी विराम घेतला आणि जवळजवळ अपरिवर्तित बंद झाला. सुरुवातीला, एक चढउतार होता, परंतु काही हेवीवेट्सच्या दबावामुळे निफ्टीला खाली ढकलले गेले, ज्यामुळे सत्राच्या शेवटपर्यंत श्रेणीबद्ध हालचाल झाली. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल दिसून आला, ऊर्जा आणि रिअल्टी क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली तर एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्र लाल रंगात संपले. तथापि, व्यापक निर्देशांक ०.५% ते १ % पर्यंत माफक नफा मिळवण्यात यशस्वी झाले.
 
२२३०० -२२४०० झोनमधील प्रतिकार अधोरेखित करून, आम्ही निफ्टी निर्देशांकावर आमचा सावध दृष्टीकोन ठेवतो आणि स्टॉक-विशिष्ट ट्रेडिंग पध्दतीने पुढे जाण्याचा सल्ला देतो. देशांतर्गत घटकांव्यतिरिक्त, संकेतांसाठी यूएस बाजारांचे बारकाईने निरीक्षण करणे उचित आहे.'