गंगा सप्तमी निमित्त काशीत 'गंगाभिषेक' उत्सव

    14-May-2024
Total Views |

Gangabhishek Utsav

मुंबई (प्रतिनिधी) :
गंगा सप्तमीच्या (Ganga Saptami) पवित्र सणानिमित्त श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ललिता घाटावर गंगाभिषेकासाठी भव्य व सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे. गंगा सप्तमीनिमित्त पहिला 'गंगाभिषेक' उत्सव ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आला होता. गंगाभिषेक पूजेला गंगा भक्त महादेव श्री विश्वनाथजी यांचे भक्त उपस्थित होते. संध्याकाळी मंदिर चौकातील शिवार्चनम मंचावरून गंगा माता आणि महादेवाच्या स्तुतीसाठी संगीतमय भजन संध्या 'गंगार्चनम्' होणार आहे.

हे वाचलंत का? : सोशल मीडियावरून हिंदू देवी-देवतांचा अपमान; मीरारोड मध्ये अब्दुलविरोधात गुन्हा दाखल
श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून माता गंगेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या विशेष कार्यक्रमासाठी संपूर्ण धाम विशेष सुशोभित दिवे लावून सजवण्यात आले होते. गंगा सप्तमीच्या दिवशी, गंगा मातेच्या विशेष पूजेचा एक भाग म्हणून, ललिता घाटावर सकाळी सहा वाजता सुंदर फुलांची सजावट करून यावेळी गंगेचा भव्य अभिषेक करण्यात आला. धाम संकुलात असलेल्या गंगा मंदिरात भव्य गंगा आराधना पूजा करण्यात आली.